Maharashtra Police | सराफ व्यापाऱ्यावर पोलीस कोठडीत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, सहायक पोलीस निरीक्षकासह 5 कर्मचाऱ्यांचे निलंबन; पोलीस दलात प्रचंड खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी (Stolen Gold) अकोल्यातील (Akola) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) शेगाव (Shegaon) येथील एका सराफ व्यापाऱ्याला (Jewelers) ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप सराफाने पोलीस अधीक्षकांकडे (SP) केलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकासह (API) 5 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित (Police Suspended) करण्यात आले आहे. (Maharashtra Police)

 

सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण (API Nitin Chavan), पोलीस शिपाई शक्ती कांबळे (Police constables Shakti Kamble), विरेंद्र लाड (Virendra Lad), मोंटी यादव (Monty Yadav), काटकर (Katkar) आणि चालक पवार (Driver Pawar) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. शेगाव येथील सराफ व्यावसायिकाला 9 जानेवारी रोजी रात्री अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. (Maharashtra Police)

पोलीस कोठडीत असतान नितीन चव्हाण आणि शक्ती कांबळे या दोन कर्मचाऱ्यांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे. गाडीतून पोलीस ठाण्यात नेत असतानाही आपल्याला मारहाण (Beating) करुन तोंडावर थुंकल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. कोठडीत चौकशीदरम्यान सोनं चोरी प्रकरणातील इतर दोन आरोपींना व्यावसायिकावर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) करण्यास लावल्याचाही आरोप सराफाने केला होता.

 

सराफ व्यावसायिक हा शेगावचा असल्याने अकोला आणि बुलढाणा पोलिसांच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात दोन समित्या स्थापन करण्यात आल्या. या दोन्ही समित्यांचा अहवाल उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. मात्र प्राथमिक चौकशीत सराफ व्यावसायिकावर कारवाईसाठी गेलेले पथक दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

9 जानेवारी रोजी सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी सराफ व्यावसायिकाला शेगावमधून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी रात्री तीन वाजता शेगाववरुन अकोला येथे नेत असताना संबंधित पोलिसांनी सराफाला गाडीत बेदम मारहाण केली.
त्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केले असता सराफाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

Advt.

या दोन दिवसांच्या कालावधीत साहयक पोलीस निरक्षक चव्हाण आणि कांबळे यांनी मारहाण केली.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संबंधित सराफ व्यापाऱ्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे.
याप्रकरणी सराफाला जामीन मिळाल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला.
त्यानंतर पीडित व्यावसायिकाने अकोला पोलीस अधीक्षक आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात (City Kotwali Police Station) फिर्याद दिली.

 

Web Title :- Maharashtra Police | Unnatural sexual harassment in a police custody on a goldsmith suspension of 5 employees including an assistant police inspector Huge commotion in the akola police force

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा