Maharashtra Political Crisis | ‘त्या’ १६ आमदारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; सुनावणी होईपर्यंत कारवाई नको

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या (Shivsena MLA) शिंदे गटाला आज (Eknath Shinde Group) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलासा दिला आहे. आज झालेल्या सुनावणीत सुनावणी पूर्ण होईपर्यंत या आमदारांवर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता खंडपीठाची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी काही काळ लागणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले. (Maharashtra Political Crisis)

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सेनेतील आमदारांना सोबत घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडले होते. त्यानंतर बंडखोर १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे अर्ज दिला होता. त्याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. तर भाजपसोबत शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली होती. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर ११ जुलै ला सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आजच्या सुनावणीत १६ आमदारांना दिलासा देतानाच सुनावणी पूर्ण होईपर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाने दिले आहेत. (Maharashtra Political Crisis)

ठाकरे यांनी केलेल्या याचिकेत असे म्हंटले आहे की, राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिले होते.
त्यानंतर हे सरकार अस्तित्वात आणणे हे सगळे असंवैधानिक असून, राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विश्वासदर्शक ठरावावेळी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी याचिका ठाकरे गटाने केली होती.
पण त्यावर न्यायालयाने ११ जुलैला सुनावणी होईल, स्पष्ट केले होते.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | 16 mlas relieved no action till hearing is completed supreme court instructs assembly speaker maharashtra political crisis uddhav thackeray cm eknath shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा