Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांसाठी गोव्यातील हॉटेल बुक, ‘या’ दिवशी नवं सरकार स्थापन होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तानाट्य येत्या चार दिवसात संपण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi Government) काऊंटडाऊन सुरु झाले असून नवी सरकारचा शपथविधी (Swearing in New Government) येत्या 3 जुलै रोजी होणार असल्याची माहिती एका वृत्तपत्राच्या वेबसाईटने खात्रीलायक सुत्रांच्या आधारे दिली आहे. यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली (Maharashtra Political Crisis) गुवाहाटीला गेलेले आमदार तत्पूर्वी गोव्यात येणार आहेत. त्यासाठी गोव्यात हॉटेलचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या तीन दिवसात सत्ता बदलाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

 

शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण मागील आठ दिवसांपासून अस्थिर झाले आहे. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. शिंदे यांच्यासोबत 50 पेक्षा जास्त आमदार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे. कोरोनामुक्त झालेले राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) हे देखील अॅक्टिव्ह झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे नेते हे मैदानात उतरले आहेत. (Maharashtra Political Crisis)

 

राज्यात लवकरच भाजप (BJP) आणि शिंदे गटाची सरकार येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी बहुमताला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा (Resignation) देण्याची शक्यता आहे. यानंतर नवीन सरकार बनविण्यासाठी राज्यपाल भाजपला बोलावतील. यापार्श्वभूमीवर आषाढी अमावस्या संपताच भाजपच्या गोटात हालचालींना वेग येईल. शिंदे किंवा प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) बच्चू कडू (Bachchu Kadu) हे राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार असल्याचे समजतेय. यामुळे पुढील चार दिवसांत राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना आता वेग येणार आहे.

भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन सरकारचा शपथविधीचा मुहूर्त 3 जुलै हा ठरला आहे.
यादिवशी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना राज्यपाल शपथ देणार आहेत. त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल.
दरम्यान, या दोन ते तीन दिवसांत गुवाहाटी येथे असलेल्या बंडखोर आमदारांना गोव्यात आणण्यात येणार आहे.
गोव्यातील एका हॉटेलमध्ये 42 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणातील एका नेत्याने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.
तसेच केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात या आमदारांना गोव्यात आणले जाणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | a change of government will take place in maharashtra and the swearing in of the new government will take place on july 3 sources said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाची ठाकरे सरकारला ‘सुरुंग’ लावण्याची तयारी, बच्चू कडू उद्या मुंबईत येण्याची शक्यता

 

Eknath Shinde | याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल; दुटप्पी भूमिकेवरुन सडेतोड पलटवार

 

NPS | निवृत्तीनंतर पाहिजे असेल दरमहिना 2 लाख रुपये पगार, तर आवश्यक करा ‘हे’ काम; वृद्धत्वात होणार नाही त्रास