Maharashtra Political Crisis | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास ठाकरे गटाचा पराभव होईल? राजकीय विश्लेषकांनी मांडले मत, जाणून घ्या

मुंबई : Maharashtra Political Crisis | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्यातील धनुष्यबाण पक्षचिन्हाचा (Dhanushaban Symbol) वाद आता निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आहे. आयोगाने त्यावर कार्यवाही सुरू केली असून शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती, तर शिवसेनेने धनुष्यबाण आमच्याकडेच रहावे, अशी मागणी केली होती. आता लवकरच धनुष्यबाण चिन्ह कोणाचे किंवा चिन्ह गोठवले तर काय होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Political Crisis)

चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असे निर्णय सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्पष्ट केल्यावर आता आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी (Andheri East Assembly By-Election) धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीवर शिंदे गट आणि शिवसेनेची पुढील राजकीय वाटचाली ठरणार आहे.

राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण चिन्हाबाबत कुठलाही निर्णय न झाल्यास निवडणूक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासाठी अवघड जाऊ शकते. विशेष करून निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक मोठी परीक्षा ठरू शकते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे शिवसेनेने निश्चित केले आहे. (Maharashtra Political Crisis)

पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने तयारी सुरू केली असली तरी मुळ मुद्दा पक्षचिन्हाचा आहे. चिन्हामुळे मतदाराला थेट आणि सहजपणे पक्षाच्या उमेदवारापर्यंत पोहचता येणार आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यास ठाकरे गटासाठी हा नैतिक विजय असेल, आणि आपोआपच खरी शिवसेना ठाकरेंचीच हा संदेशही सर्वत्र जाईल. पक्षातील बहुमत ज्याच्याकडे त्या आधारावर धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय पूर्णपणे पारदर्शी असेल, असे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Election Commissioner Rajeev Kumar) यांनी म्हटले आहे.

पोटनिवडणुकीबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी म्हटले आहे की, पोटनिवडणुकीत आमचाच मोठ्या फरकाने विजय होईल.
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास पोटनिवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसेल, हे जे दावे केले जात आहेत त्यात कुठलेही तथ्य नाही.
आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्याशी असलेल्या आपुलकीच्या नात्यातून आणि शिवसेनेने केलेल्या चांगल्या कामातून लोक मत देतील.
तसेच काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) शिवसेना उमदेवाराला पाठिंबा देतील.

दरम्यान, राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, अनेक दशकांपासून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकरूप झालेले आहे.
अशावेळी निवडणूक आयोगात चिन्हाच्या लढाईत ठाकरे गट पराभूत झाल्यास किंवा हे चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाचा नैतिक विजय असेल.
याचा फायदा भाजपला (BJP) होईल. मागील काही प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने अशा वादात चिन्ह गोठवले आहे.
आणि या प्रकरणात खरी शिवसेना कोणती? याचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची अधिक शक्यता आहे.

भाजपाने संकेत दिले आहेत की अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत माजी नगरसेवक मुरजी पटेल (Murji Patel) हे पक्षाचे उमेदवार असतील.
दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pavaskar) यांनी म्हटले की,
शिंदे गटातून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
कुठलाही निर्णय मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) घेतील.
पण अद्यावर यावर निर्णय झालेला नाही.

Web Title :- Maharashtra Political Crisis | andheri east bypoll task uphill for uddhav thackeray faction shivsena in area if symbol is frozen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Former BJP MLA Vilasrao Jagtap | राष्ट्रवादीच्या नेत्यासमोर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा पक्षाला घरचा आहेर, म्हणाले…

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली