Maharashtra Political Crisis | आर्थर रोड जेल प्रशासनाने उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांची भेट नाकारली

मुंबई : Maharashtra Political Crisis | न्यायालयीन कोठडीत असलेले आर्थर रोड तुरुंगात असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेण्याची इच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. मात्र, तुरुंग प्रशासनाने ठाकरे यांना भेट नाकारली आहे. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना भेटायचे असेल, तर यासंदर्भात त्यांनी न्यायालयाची परवानगी घ्यावी. सर्वसामान्य कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते, त्याच पद्धतीने त्यांना राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra Political Crisis)

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात 1 हजार 034 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये आहेत. ईडीने राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. यानंतर 5 सप्टेंबर रोजी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे राऊत आता 19 सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्ये राहणार आहेत. (Maharashtra Political Crisis)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती.
मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना भेटता
येईल, असे तुरुंग प्रशासनाने कळवले आहे. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत
यांना तुरुंगात भेटण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिले नव्हते.

दरम्यान, करागृहाच्या नियमांनुसार, केवळ रक्ताचे नाते असणार्‍या व्यक्तींनाच कैद्याला तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर भेटता येते.
इतर कोणाला कैद्याला भेटायचे असेल तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.
आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्याची शक्यता आहे.

Web Title :- Maharashtra Political Crisis | arthur road jail administration denied permission shiv sena chief uddhav thackeray to meet mp sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LIC New Policy | LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लान, जाणून घ्या लाभ, वैशिष्ट्ये आणि इतर तपशील