Maharashtra Political Crisis | अमित शाहांसोबत बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग, भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला; 30 जुनलाच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची (BJP Core Committee) बैठक पार पडली होती. त्यानंतर आज फडणवीस दिल्ली गेले. दिल्लीत अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president JP Nadda) यांची भेट घेतली. दिल्लीवरुन आल्यानंतर (Maharashtra Political Crisis) फडणवीस यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर हे सर्व नेते राजभवनावर राज्यपालांना भेटण्यासाठी गेले. त्यामुळे राज्यातील सत्तानाट्याचा दुसरा भाग सुरु झाला आहे.

 

भाजपच्या नेत्यांची सागर बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर हे सर्व नेते राजभवनावर पोहोचले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार (Ashish Shela), प्रवीण दरेकर (Praveen Darekar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा समावेश आहे. येत्या 30 तारखेला सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा अशी मागणी हे भाजप नेत्यांनी केली आहे. भाजपच्या मागणी नंतर राज्यपालांनी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Political Crisis)

दरम्यान, शिंदे गटात (Shinde Group) सहभागी झालेले बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि 10 आमदार उद्या मुंबईत येणार होते.
ते राज्यपालांची भेट घेणार होते. दुसरीकडे शिंदे यांनी स्वत: आजचा एक दिवस उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)
यांना निर्णय घेण्यासाठी दिला होता.
असे असताना गेल्या दिवसांपासून चिडीचूप असलेले भाजप नेते थेट राजभवनावर गेल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | ask the cm uddhav thackeray government to table a no confidence motion on june 30 bjp leader to meets governor before eknath shinde revolt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाची ठाकरे सरकारला ‘सुरुंग’ लावण्याची तयारी, बच्चू कडू उद्या मुंबईत येण्याची शक्यता

 

Eknath Shinde | याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल; दुटप्पी भूमिकेवरुन सडेतोड पलटवार

 

NPS | निवृत्तीनंतर पाहिजे असेल दरमहिना 2 लाख रुपये पगार, तर आवश्यक करा ‘हे’ काम; वृद्धत्वात होणार नाही त्रास