Maharashtra Political Crisis | शिंदे गटाची ठाकरे सरकारला ‘सुरुंग’ लावण्याची तयारी, बच्चू कडू उद्या मुंबईत येण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेतील आमदारांनी बंड (Shivsena Rebel MLA) पुकारल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) संकटात सापडले असताना मंत्रिमंडळ बैठकांमध्ये लोकहिताचे निर्णय घेण्याचा सपटा लावला आहे. मविआ सरकार निवडणुकीची (Election) तयारी करत आहे. असे असताना दुसरीकडे शिंदे गट मविआ सरकारला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे. आता शिंदे गटाकडून काही आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात (Maharashtra Political Crisis) येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

आषाढी आमावस्येमुळे शिंदे गटाने राज्यपालांना (Governor) भेटण्याचे पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे गटाला चर्चेला मुंबईत येण्याचे आवाहन केले. तर शिंदे यांनी एक दिवसाची मुदत देत ठाकरे यांनी निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. यामुळे आमावस्या संपली की उद्या बच्चू कडू 10 बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईत येणार असून राज्यपालांना भेटतील असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. एका मराठी वृत्त वाहिनीने याबाबत माहिती दिली आहे. या आमदारांच्या संरक्षणासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसह (Maharashtra Police) केंद्रीय सुरक्षा (Central Security) यंत्रणा तैनात केली जाणार आहे. (Maharashtra Political Crisis)

बच्चू कडू हे राज्यपालांना ठाकरे सरकार (Thackeray Government) अल्पमतात असल्याचे पत्र देतील.
या पत्रावर शिवसेनेच्या गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांच्या सह्या असणार आहेत. पत्र तयार आहे,
रात्रीपर्यंत सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या जातील. या आमदारांमध्ये शिवसेना नाही तर अपक्ष आमदार अधिक जाण्याची शक्यता आहे.
तसे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले.
शिवसेना आमदारांपेक्षा अपक्ष आमदारच पुढे होऊ राज्यपालांना ठाकरे सरकारविरोधात पत्र देतील, असे केसरकर म्हणाले होते.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | bacchu kadu and 10 rebel mlas will arrive in mumbai tomorrow eknath shinde group will send independents to the governors meeting a

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 

Mukesh Ambani News | मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचा दिला राजीनामा, आकाश अंबानी बनले कंपनीचे चेअरमन

 

Maharashtra Political Crisis | “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..! ‘एकनाथ शिंदे आमदार शहाजीबापूंना म्हणाले ‘Once More’