Maharashtra Political Crisis | ’36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल’; बच्चू कडूंचा मोठा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे 35 नव्हे तर 40 आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदेसह संबंधित आमदार आसाममधल्या गुवाहाटी (Guwahati) येथे दाखल झाले आहेत. त्याठिकाणी महाविकास आघाडीमधील मंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) देखील सोबत आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे.

 

त्यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “सध्या 36 आमदार सोबत आहेत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3 आहेत, म्हणजे एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर काँग्रेसचेही काही आमदार संपर्कात असल्याची मोठी माहिती बच्चू कडू यांनी फोनवरून एका वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यामुळे बच्चू कडू हे एकनाथ शिंदेसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

पुढे बोलताना ते म्हणाले, “आता गुवाहाटीमध्ये आहे. आज संध्याकाळपर्यंत काय आहे ते समजेल. सध्या आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत. तसेच, भाजपचे संजय कुटे (Sanjay Kute) आमच्यासोबत आहेत.” अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर व्यक्तिगत नाराजी नाही. निधी वाटपात विषमता होती. शिवसेनेच्या आमदारांकडे लक्ष द्यायची गरज होती. तर, मी मुख्यमंत्र्यांना स्वत:हून फोन केला होता. थोडी त्यांच्यात नाराजी दिसून आली.” असं देखील ते म्हणाले.

 

आम्ही शिवसेनेत राहणार, पण वेगळा गट करणार –

एकनाथ शिंदे सोबत असलेले शिवसेना नेते आणि मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले की,
“आता आम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृ्त्व मान्य केलं आहे.
ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. शिंदेसाहेबांसह 6 मंत्री आहेत.
आम्ही पक्ष बदलणार नाही, शिंदेसोबत राहणार. बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत.
एकनाथ शिंदेंसोबत राहणार. आम्ही शिवसेनेत राहणार, पण वेगळा गट राहणार,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | Bacchu kadu on maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा