Maharashtra Political Crisis | ‘कायद्याच्या सोयीचे कागदपत्रे…’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना बच्चू कडूंचे मोठे विधान

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Leader Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. बंडखोरीनंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही गटातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) वाद आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. यावर मंगळवारी (दि.14) सुनावणी होणार आहे.

 

मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत (Maharashtra Political Crisis) काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असताना प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी मोठं विधान केलं आहे. न्यायालयातील सुनावणीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी मजबूत तयारी केली आहे. कायद्याच्या (Law) चौकटीत बसण्याच्या सोयीचे झाले असतील, तर न्यायालयातील निर्णय त्यांच्या बाजूने लागेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

 

सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, चिन्हापेक्षा मत कोणाला आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. मी पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढलो. पतंग, विमान, नारळ, कपबशी अशी चिन्ह मला मिळाली. पण शेवटी माणूस महत्त्वाचा असतो. चिन्ह कुणालाही मिळालं तरी काही फरक पडणार नाही. पण लोकांना वाटतं की, हे चिन्ह आम्हला मिळालं पाहिजे.

एकनाथ शिंदे यांनी मजबूत तयारी केली आहे. परिपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत.
न्यायालयात भावनेवर निर्णय होत नसतो, तो कागदावर होतो. कारण आपण कागदाला महत्व देतो.
उद्या मी न्यायालयात जाऊन लढलो, तर तो निर्णय माझ्या बाजुने लागणार नाही. तुमच्याकडे कागदं कोणती आहेत.
ते कायद्याच्या चौकटीत बसतात का? हे कोर्ट पाहतं.
कायद्याच्या चौकटीत बसण्याच्या सोयीची कागदपत्रे तयार झाले असतील, तर निश्चितच निर्णय त्यांच्या बाजूने लागेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | bachchu kadu on supreme court hearing about political dispute in maharashtra eknath shinde uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vasai Crime News | ‘मरने दे साले को’ म्हणत कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं

Pune Crime News | सेक्‍सटॉर्शन प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Pune Crime News | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची 4 थी कारवाई

NCP Chief Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवार म्हणाले – ‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे…’