Maharashtra Political Crisis | सुनावणी आधी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात मांडली बाजू, शिंदे गटाला धक्का बसणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात शिवसेनेत (Maharashtra Shiv Sena) दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची ? याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार आहे. त्यापूर्वी शिवसेनेने आपली भूमिका न्यायालयात (Maharashtra Political Crisis) मांडली आहे. शिवसेनेनं दिलेल्या स्पष्टीकरणामुळे शिंदे गट (Shinde Group) अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांवर (MLA) अपात्रतेची कारवाईच्या मागणीवरुन मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर (Maharashtra Political Crisis) आज सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

शिंदे गटाने पक्षाविरोधात गैरकृत्य केले आहे.
आपले कृत्य योग्य असल्याचे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसवर (Congress) आरोप केले आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे आपले मतदार नाराज असल्याचा आरोप त्यांनी केला.
परंतु, सत्य हे आहे की, हीच लोक अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Govt) मंत्री राहिले आहेत.
त्यावेळी त्यांना कोणतीच अडचण नव्हती. शिंदे गट ज्या भाजपला (BJP) आपला जुना मित्रपक्ष मानत आहेत.
त्याच भाजपने शिवसेनेला कधीच बरोबरीचा दर्जा दिलेला नाही, असं शिवसेनेनं आपल्या उत्तरात स्पष्ट केले.

याशिवाय, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्री मिळाले आहे.
त्यावेळी सरकार स्थापन झाले होते, त्यावेळी या आमदारांनी सर्व सोई आणि सुविधांचा फायदा घेतला.
त्यावेळी त्यांनी कधी मतदार आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले नाही.
जर ही लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यामुळे इतकेच त्रस्त होते तर कॅबिनेटमध्ये (Cabinet) सहभागी झाले नसते, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | before the hearing in the supreme court shiv sena presented a counter argument

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा