Maharashtra Political Crisis | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | बंडखोर शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या गटाचे संख्याबळ वाढत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आता भाजपाने या गटाला सत्तास्थापनेसाठी मोठी ऑफर दिल्याचे वृत्त आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या दिड दिवसाच्या सरकारमध्ये अजित पवारांना दिलेली ऑफरच शिंदे गटाला भाजपाने दिली आहे. (Maharashtra Political Crisis)

 

एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदासह 17 मंत्रिपदे आणि 6 महामंडळे भाजपाकडून मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळू शकतात. सध्याच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्री शिंदे गटात आहेत. या 6 मंत्र्यांना नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

 

एकनाथ शिंदे यांनी पक्षाला आवाहन करताना म्हटले होते की, आम्ही शिवसैनिकच आहोत. पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून पारंपारिक मित्र असलेल्या हिंदुत्ववादी भाजपासोबत सरकार स्थापन करावे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतची शिवसेनेची आघाडी अनैसर्गिक आहे, अशी भूमीका शिंदे यांनी घेतली होती. (Maharashtra Political Crisis)

 

तसेच शिंदे यांनी आरोप केला होता की, सत्तेच्या अडीच वर्षात केवळ घटकपक्षांचाच फायदा झाला, यात शिवसैनिक भरडले गेले. शिवसेनेचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे आहे.

 

शिंदे गटाच्या बंडखोरीमागे कोण आहे हे उघड आहे. त्यामुळे पुढे काय होणार याबद्दल मांडलेले अंदाज खरे ठरत आहेत.
त्यानुसार भाजपाने आता शिंदे गटाला सत्ता स्थापनेसाठी ऑफर दिल्याचे वृत्त आले आहे.
दरम्यान, गुवाहाटीमध्ये शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. दुपारी शिंदे गटाची एक बैठक झाली यात महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | big offer from bjp to shinde group

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा