Maharashtra Political Crisis | राज्यात भाजपसोबत नवं सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे गटाचं ‘हे’ आहे प्लॅनिंग, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेतील बंडखोरीनंतर (Shivsena Rebel MLA) राज्यातील राजकीय अस्थिरता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राहणार की जाणार, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे न्यायालयाने निर्णय दिलेला असताना दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपा (BJP) नेते चांगलेच अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. भाजपाने राज्यपालांकडे केलेल्या मागणीनंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विधानभवन सचिवालयाला (Vidhan Bhavan Secretariat) पत्र लिहून उद्या 30 जून रोजी बहुमत सिद्ध (Maharashtra Political Crisis) करण्याचे आदेश दिले आहेत.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपच्या या हालचालीनंतर अपेक्षेनुसार शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) हालचालींना सुद्धा वेग आला आहे. शिंदे गटाने आम्ही मुंबईत फ्लोअर टेस्टसाठी (Floor Test) येणार आहोत, असे म्हटले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी कामाख्या देवीला बळी देण्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा धागा पकडत बंडखोर माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणे मागितले आहे. कामाख्या देवीचे दर्शन हा श्रद्धेचा विषय आहे. आपले मागणे घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देते.

शिंदे यांनी पुढे म्हटले की, आता आम्ही उद्या सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्टसाठी मुंबईत जाणार आहोत आणि जी कोणतीही प्रक्रिया पार पाडायची असेल, त्या पद्धतीची पूर्तता करू. शिवसेनेच्या 39 आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांनी इ मेल द्वारे तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने पत्राद्वारे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचा दावा राज्यपालांकडे केला आहे. माध्यमांमधील बातम्या पाहता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी अपरिहार्य असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

राज्यात 3 जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
भाजपा आणि शिवसेनेचे सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे गटाने राजकीय डावपेच आखल्याचे समजते.
आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सर्व आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना,
अशी भूमीका बंडखोर गट घेणार आहे.

 

त्यामुळे सरकार भाजप-शिवसेनेचे स्थापन होईल,
आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पुढील काही वर्ष चालू राहील,
असा डाव एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने आखल्याचे समजते.

 

शिवसेना नाव वापरण्याच्या मुद्द्यावर विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे (Former Principal Secretary Anant Kalse)
यांनी म्हटले की, शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेले असल्याने याबाबत आयोगाच्या परवानगीनेच बंडखोर आमदारांना हे नाव वापरता येईल.
आयोगाच्या अनुमतीशिवाय नाव कोणालाही वापरता येणार नाही.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | bjp and shiv sena government to be formed in the maharashtra this is the strategy of the shinde group maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा