Maharashtra Political Crisis | आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर शिशुसेना काढण्याच्या तयारीत – भाजप आमदार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | मुंबईत शिंदे- फडणवीस सरकारविरोधात (Shinde Fadnavis Government) तीव्र झालेल्या आरेमध्ये कारशेड (Aarey Car Shed) उभारण्याच्या निर्णयाविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलनात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे रविवारी देखील सहभागी झाले होते. यामध्ये लहान मुलांनीही सहभाग घेतल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) नोटीस बजावून ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच संदर्भात भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एक ट्विट करत आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याची तक्रार ‘सह्याद्री राइट फोरम’चे विधी विभाग प्रमुख दृष्टीमान जोशी यांनी ट्विटरवरून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे केली होती. याची दखल घेत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य यांना लक्ष्य केले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत, अशी टीका भातखळकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.
आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर करणे हे त्यांच्या असंवेदशीलता आणि वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक आहे.
शिल्लक सेनेकडे कार्यकर्ते उरले नाहीत बहुधा. आदित्य ठाकरे यांचा तीव्र निषेध, असे आणखी एक ट्विट भातखळकर यांनी तत्पूर्वी केले होते.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले की,
मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेमधील अल्पवयीन मुलांचा वापर ‘आरे वाचवा’ आंदोलनासाठी केला आहे.

 

याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहे.
संबंधितांनी हातात पोस्टर घेऊन आंदोलन करणार्‍या अल्पवयीन मुलांचे फोटो देखील शेअर केले आहेत.
त्यामुळे संबंधित आरोपीविरोधात तात्काळ एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची विनंती, आयोगाकडून केली जात आहे.
हे पत्र मिळाल्यानंतर तीन दिवसात कारवाई करून संबंधित अहवाल आयोगाकडे पाठवावा, असे आयोगाने म्हटले आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar slams shiv sena aditya thackeray over protest against metro car shed in aarey

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा