Maharashtra Political Crisis | भाजपने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना उद्या सकाळी 9 वाजता मुंबईत बोलावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आल्याने भाजपच्या (BJP) मागणीवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उद्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. राज्यात सत्तापालट होण्याची शक्यता असून भाजपने राज्यभरातून नगरसेवक (BJP Corporators) आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्या सकाळी 9 वाजता विधान भवन येथे बोलावले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. (Maharashtra Political Crisis)

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना व अपक्ष आमदार यांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. सत्तेच्या सारिपाटावरून कायदेशीर लढाई सुरू असली तरी भाजप ने एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. अशातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपच्या मागणीवरून 30 जूनला विशेष अधिवेशन बोलावले असून बंडखोर आमदार देखिल गुवाहाटी वरून उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्ट ला उपस्थित राहणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांनी मागील आठवडाभरात केलेली आंदोलन पाहता भाजपने देखील शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. (governor bhagat singh koshyari)

 

भाजपने कालच सर्व आमदारांना मुंबईत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
तर आज पुणे, पिंपरी चिंचवड सह राज्यातील भाजपचे नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सकाळी 9 वाजेपर्यंत मुंबईतील विधान भवन येथे उपस्थित राहण्याचे निरोप देण्यात आले आहेत.
त्यामुळे जर उद्या फ्लोअर टेस्ट झालीच तर विधान भवन परिसरात प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title :-  Maharashtra Political Crisis | BJP called the corporators and office bearers in Mumbai tomorrow at 9 am

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा