Maharashtra Political Crisis | ‘आम्ही सरकार पाडणार नाही, पण…’; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यातील राजकीय वातावरण अधिकच दुषित (Maharashtra Political Crisis) होत चालले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) युती करण्याचं वक्तव्य केल्याने राज्यात सत्ता बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र यावर भाजपकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिली जात नाही. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही सरकार पाडणार नाही, पण, ठाकरे सरकार (Thackeray Government) त्यांच्यामधील बंडाळीमुळे पडेल,’ असा दावा त्यांनी केला.

 

“सद्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याच,” रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. गेल्या अडीच वर्षात या राज्यातील सरकारला ज्या – ज्या गोष्टीत अपयश आले, त्या सर्वांचे खापर त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर (Central Government) फोडले. मग अतिवृष्टी असो, शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न असो किंवा कोरोना काळातील परिस्थिती असो, प्रत्येकवेळी आम्हाला दोषी ठरवले.” असं दानवे म्हणाले. (Maharashtra Political Crisis)

 

“खरतर विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेना युतीला मतदान केले. यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. त्यावेळी शिवसेनेने कोणताही आक्षेप घेतला नाही. पण, जेव्हा निकाल हाती आले तेव्हा यांच्या लक्षात आले की, आमच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर युती केली आणि अनैसर्गिक सरकार बनवले.” असं दानवे म्हणाले.

“भाजप काही मुकदर्शी पार्टी नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीकडे आमचे पूर्णपणे बारकाईने लक्ष आहे.
कोणत्या स्थितीमध्ये काय करायचे याचे निर्णय आम्हाला करावेच लागेल. आमच्या बैठका सुरूच आहे.
पण या बैठका शिवसेना बंडखोरांच्या बाबतीत आहे असे होत नाही.” असं दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

 

दरम्यान, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
सगळी जबाबदारी त्यांची असून, अशाप्रकारे तोडफोड करून राज्य चालवता येत असेल किंवा बहुमत टिकवता येत असेल तर याचा निर्णय जनता करेल.
आम्ही सद्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून, आमच्याकडे अजूनही कुणाचा प्रस्ताव आला नाही.
तसेच, या बंडाळीशी भाजपचा संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Maharashtra Political Crisis | BJP leader and union minister raosaheb danve on maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा