Maharashtra Political Crisis | ‘महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा’; भाजपचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यातील राजकीय परिस्थितीला नवं वळण लागलं (Maharashtra Political Crisis) आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सध्या चाळीसहून अधिक आमदार असल्याची माहिती आहे. भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करा असं शिंदे गट म्हणत असल्याची चर्चा आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजप नेते उघडपणे कोणतेही प्रतिक्रिया देताना दिसत नाही. अखेर सध्याच्या घडामोडींवर भाजपने एन्ट्री घेतली आहे.

 

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत असतानाच आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना पत्र पाठवले आहे. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि स्वत: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे, असं दरेकर यांनी पत्रातून म्हटले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, अडीच वर्ष निर्णय शून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देतेय. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलीस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा देखील घाट घातला जातोय. महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्यादृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारमार्फत अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे.
कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागलेत.
आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त देखील प्रकाशित झाले आहे.
160 च्या वर शासनआदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत.
विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | bjp letter to governor interfere in mahavikas aghadis current decision maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; ‘जे गेलेत त्यांचा विचार करू नका….’

 

Pune Crime | बसण्यास खुर्ची न दिल्याने टोळक्यांचा कात्रजमध्ये ‘राडा’ ! दोघा तरुणावर वार करुन हॉटेलवर केली दगडफेक, कोंढव्यात गुन्हा दाखल

 

Raju Shetty | ‘भाजपा ‘या’ 3 जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न’ – राजू शेट्टी