…तर पुन्हा निवडणूका ?, सत्तास्थापनेच्या पेचामुळे आमदारांना ‘झटका’ बसणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ सुटताना दिसत नाहीये. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राजकीय फासेच पलटले. आता हा पेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे, असे असेल तरी हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणी न्यायालयात मंगळवारी आदेश देण्यात येणार आहेत.

भाजप जर बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर भाजप सरकार कोसळू शकते. त्यानंतर महाविकासआघाडीला सरकार स्थापनेची संधी द्यायची किंवा नाही हे राज्यपालांवर अवलंबून आहे.

जर राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली तर पुन्हा एकदा राज्यात विधासभेच्या निवडणूका लागू शकतात. असे झाले तर राज्यातील आमदारांना मोठा धक्का बसेल. कारण पक्षांना आणि उमेदवारांना पुन्हा एकदा निवडणूकीला समोरे जावे लागेल. राज्यातील जनता सरकार स्थापनेच्या पेचामुळे संतापात आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूका झाल्या तर बहुमताचा आकडा गाठणं तर दूरच निवडूण येणं देखील मुश्किल होईल. त्यामुळे आमदारांना घाम फुटला आहे.

काही राजकीय विश्लेषकांच्या मते पुन्हा निवडणूका होणं सध्याच्या परिस्थिती शक्य नाही. विरोधी पक्षांकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत आहे. भाजप बहुमत सिद्ध करु शकले नाही तर महाविकासआघाडीला संधी मिळू शकते. आज सर्वोच्च न्यायालयाने देखील आपला निकाल राखून ठेवला आहे. यावर मंगळवारी आदेश येईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागून आहे.

महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेण्यात आली आणि सांगण्यात आले की आमच्याकडे बहुमत आहे. त्यांच्याकडून 162 आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांसह विधानसभा सचिवांना देण्यात आले आहे. परंतू भाजपकडून यावर आक्षेप घेण्यात आला. भाजप नेते आशीष शेलार यांनी महाविकासआघाडीच्या पत्राबाबत खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला.

महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांना देण्यात आलेले पत्र म्हणजे सत्तास्थापनेचा दावा नसून दिशाभूल करणारे पत्र आहे. या पत्रावर गटनेत्यांची स्वाक्षरी नसल्याचे सांगत आम्ही या पत्राला गांभीर्याने घेणार नाही. आशीष शेलार यांनी सांगितले.

Visit : Policenama.com