Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमदार (MLA) आणि खासदारांसह (MP) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena party Chief Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सक्रीय झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या (Shiv Samvad Yatra) माध्यमातून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. यातच एकनाथ शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर (Maharashtra Political Crisis) जाणार होते. परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांनी नियोजित दौरा रद्द केला. यातच उद्धव ठाकरे यांना दोन वर्षात जे जमलं नाही, ते एकनाथ शिंदे यांनी आठ दिवसांत करुन दाखवलं, असा टोला भाजपने (BJP) लगावला आहे.

 

भाजप खासदार उन्मेश पाटील (BJP MP Unmesh Patil) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, केवळ सत्तेसाठी पदे अन् राजकारण करु नका, आधी मातीशी निष्ठा राखा, शेतकऱ्यांची निष्ठा राखा, मग राजकारण करा अशा शब्दात पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला (Maharashtra Political Crisis) आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकीकडे कामांना परवानगी द्यायची नाही, दुसरीकडे निष्ठा यात्रा काढून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा आदित्य ठाकरे यांना अधिकार नसल्याची टीका उन्मेश पाटील यांनी केली.

 

एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं

गिरणा नदीवर बलून बंधाऱ्यासाठी अनेकवेळा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला.
परंतु, दोन वर्ष उलटल्यानंतरही परवानगी मिळाली नाही.
ती परवानगी मिळाली असती तर खान्देशाच्या (Khandesh) मातीशी निष्ठा राखण्याचा आणि बोलण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असता,
अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंवर करत, सरकार बदल्यानंतर आठ दिवसांत या प्रस्तावाला मान्यता मिळते,
आणि आदित्य ठाकरे हे मंत्री असतानाही दोन दोन वर्ष त्याला मान्यता मिळत नाही, याला काय म्हणावे, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
तसेच राजकारण करण्यापेक्षा तिरंग्यावर निष्ठा ठेवा असा सल्ला पाटील यांनी दिला.
तसेच राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, असाही टोला पाटील यांनी लगावला.

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | bjp mp unmesh patil slams shiv sena aditya thackeray over not give permission to work

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा