सत्तेचा ‘तिढा’ कायम, राज्यात कर्नाटक ‘पॅटर्न’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाली आहे. राज्यात सत्तासंघर्ष अधिकच चिघळला आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, असे असले तरी गोवा राज्य न सोडणारा भाजप महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची सत्ता सोडणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ शुक्रवारी संपत असून अद्याप राज्यात सत्तासंघर्ष संपताना दिसत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजप 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निकालानंतर 14 दिवसांनी भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली पण सत्तास्थापनेचा दावा मात्र केला नाही. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु आहे का, अशी चर्चा सध्या राज्यात सुरु झाली असून राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती नसल्याचे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले आहे.

काय घडले होते गोव्यात आणि कर्नाटकात ?
गोव्यामध्ये 2017 मध्ये विधानसभेत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष बनला होता. पण 13 जागा मिळवत भाजपने सत्तेत बाजी मारली होती. तर 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या. भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला मात्र सत्ता स्थापन करता आली नाही. कर्नाटकात जेडीयू आणि काँग्रेसचे सरकार आले. परंतु हे सरकार काहीच महिने टिकले. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याने जेडीयू आणि काँग्रेसचे सरकार कोसळले आणि पुन्हा भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन केली. दिल्लीतल्या सत्तेसाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे दोन महत्त्वाची राज्य असल्याने केंद्रातील नेते महाराष्ट्र राज्य हातून जाऊन देईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके