मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानंतर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) निकतेच्या गप्पा मारल्या जात आहेत. परंतु नैतिकता शिल्लक असेल तर आणि निवडणूकीची खुमखुमी असेल तर ठाकरे गटत उरलेल्या, शिवसेना (Shivsena) व भाजपच्या (BJP) मतांवर निवडून आलेल्या आमदारांनी आधी राजीनामे द्यावेत, अस खुलं आव्हान खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी ठाकरे गटाला दिले आहे. तसेच तुमच्या पाठिशी लोक असतील तर निवडणुकांना सामोरे जा, निवडून या आणि मग नैतिकतेच्या गप्पा मारा, असा टोला श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील शिवसेना भाजप युती सरकार (Shiv Sena BJP Alliance Government) आणखी भक्कम झाले आहे. परंतु त्यानंतर विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असल्याचे, श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषदेचे आयजोन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant), अॅड. निहार ठाकरे (Adv. Nihar Thackeray) उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच न्यायलयाच्या निकालाचे वाचन करुन ठाकरे गटाच्या 8 पैकी 6 मागण्या फेटाळण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्यांनी 2019 मध्ये भाजप सोबत निवडणूक (Election) लढवली. एकत्रित लोकांसमोर गेले. बॅनरवर फोटो लावले आणि युतीत निवडून आले. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसू लागल्याने दुसऱ्यासोबत संसार थाटला. नैतिकता असती तर दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले नसते, अशी टीका शिंदे यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker) निवड वैध ठरवले आहे. त्यांना अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आता काही जण न्यायालयाच्या निर्णयापेक्षा मोठे झाले आहेत, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते. मात्र ते स्वत: मुख्यमंत्री झाले.
ती जनतेसोबत गद्दारी आणि जनमताची प्रतारणा नव्हती का?
ठाकरे गटाने न्यायलयात केलेल्या 8 मागण्यापैकी 6 मागण्या फेटाळून लावत त्यांना दणका दिला आहे. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली ते कामकाजात सहभागी होऊ देऊ नका, अशी त्यांची मागणी होती. मात्र न्यायलयाने ही मागणी फेटाळून लावल्याचे शिंदे यांनी सांगितले.
अध्यक्षांनी चौकशी करुन निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. परंतु न्यायलयाचा अपमान करण्याचे काम,
नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम, नागरिकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे बोलण्याचे काम केले जात आहे.
खोटी माहिती पसरवली जात आहे, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला.
तसेच सरकार पडणार म्हणून सातत्याने खोटे पसरवले जात आहे.
आपल्या बाजूने सहानभूती मिळवी यासाठी हे खोटे बोलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.
Web Title :- maharashtra political crisis cm eknath shinde son mp shrikant shinde
gives open challenge to uddhav thackeray mlas to resign
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Devendra Fadnavis | परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)