Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Leader Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) संकटात सापडलं आहे. राज्यपालांनी उद्या फ्लोर टेस्ट (Floor Test) करण्याचे आदेश दिले आहे. पण मुख्यमंत्री या फ्लोर टेस्टला (Maharashtra Political Crisis) सामोरे जाणार नाहीत. दरम्यान सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संबोधित करताना आपण राजीनामा (Resignation) देत असल्याचे जाहिर केले.

 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज मला विशेषत: शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्याचे आहे. आज निर्णय घेताना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही. सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला, असे म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले. (Maharashtra Political Crisis)

 

ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं ते हिमतीने सोबत आहे, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसेना, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्यासाठी शिवसेना भवनावर येणाऱ्या समर्थकांचे आभार माने. राज्यपाल महोदयांनी धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी लोकशाहीचा मान राखलात, एक कॉपी दिल्यावर 24 तासात आदेश दिला असे म्हणत त्यांनी राज्यपालांचे खोचक शब्दात आभार मानले. तसेच विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांनी मंजूर केली असती तर मान अधिक वाढला असता, असेही ते म्हटले.

काँग्रेस बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार होती. अशोक चव्हाण (Ashok Chavan) मंत्रीमंडळ बैठकीनंतर म्हणाले की आम्ही बाहेर पडतो, पण त्यांना सांगा असं वेड्यासारखं वागू नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. डोकी फक्त मोजण्यासाठी वापरायची की कामासाठी? असा प्रश्न विचारत आपल्याला डोकी मोजण्याची इच्छा नाही.
माझ्या विरोधात एकही माझा माणूस राहिला तर माझ्यासाठी ते लज्जास्पद आहे. मला तो खेळच खेळायचा नाहीय.
मला प्रामाणिकपणे असं वाटतं की शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य मिळत असेल तर त्यांना मिळी द्या, अशी खोचक टीका त्यांनी केली.

 

आम्ही हापालेले होऊ जात नाही. मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे.
मी घाबरणार नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय.
वारकरी म्हणतात उद्धव ठाकरेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा व्हावी. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाही.
मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे.
शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामी मी देत आहे.
मी पुन्हा येईल असं बोललो नव्हतो, असे ते म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vivek Phansalkar Mumbai CP | राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी, दुसरीकडे विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

 

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबईत केंद्राने पाठवले सीआरपीएफचे तब्बल 2 हजार जवान

 

Post Office Scheme | ‘या’ सरकारी योजनेत काही वर्षांतच पैसे होतील दुप्पट, जाणून घ्या सविस्तर