Maharashtra Political Crisis | ‘मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा…’ ठाकरे सरकार पडल्यानंतर फडणवीसांचे जुने ट्विट व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | गोष्ट 2019 मध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतरची (Assembly Election) आहे. भाजप (BJP) आणि शिवसेनेने (Shiv Sena) एकत्र निवडणूक लढवली तेव्हा 105 जागा जिंकून भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला, तर शिवसेना 56 जागांसह दुसर्‍या क्रमांकावर होती. त्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदाची खुर्चीवर विराजमान होतील, असे मानले जात होते.

 

त्यावेळी मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमधील तेढ एवढी वाढली की राज्यातील तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड केली गेली.

 

त्याच वेळी, 2018 साली भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले नाना पटोले यांची रविवार, 1 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
त्यादरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काव्यात्मक शैलीत मनाची व्यथा मांडताना म्हटले,
मेरा पानी उतरते देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा. (Maharashtra Political Crisis)

 

आता महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार पडणार, अशी अटकळ बांधली जात होती.
ज्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच अंतिम शिक्कामोर्तब झाले.
त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाच्या मदतीने भाजप पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकते.

 

शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सध्या त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांची महाराष्ट्र विधानसभेत (Maharashtra Legislative Assembly)
विरोधकांवर केलेली काव्यात्मक शैलीतील टिका सोशल मीडिया (Social Media) वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Web Title :-  Maharashtra Political Crisis | devendra fadnavis twit goes viral on social media after the fall of uddhav thackeray mahavikas aghadi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा