Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना भेटले एकनाथ शिंदे, सर्किट हाऊसमध्ये होते Amit Shah

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रतील पाच दिवसांच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यावेळी गृहमंत्री अमित शहा हेदेखील वडोदरात उपस्थित होते. रात्री 10.30 च्या सुमारास देवेंद्र फडणवीसही मुंबई विमानतळावर दिसले. (Maharashtra Political Crisis)

 

एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री गुवाहाटीहून खासगी जेटने वडोदरा येथे रवाना झाले होते. भेटीनंतर ते शनिवारी सकाळी 6.45 च्या सुमारास गुवाहाटीला परतले.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह हे देखील शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून आज सकाळी वडोदरात होते. त्यांचा मुक्काम सर्किट हाऊसमध्ये होता. फडणवीस आणि शिंदे यांची भेट झाली की नाही हे सांगणे कठीण आहे. (Maharashtra Political Crisis)

 

त्याचवेळी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची जाण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. या बैठकीकडे अनेक दृष्टीकोनातून पाहिले जात आहे कारण एकनाथ शिंदेही आपला मोर्चा जोरदार सांभाळत आहेत तर उद्धव ठाकरेही अ‍ॅक्शनच्या मोडमध्ये आहेत. बंडखोरी झाल्यापासून एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी वकिली करत आहेत.

 

16 बंडखोर आमदारांना नोटीस
शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना उपसभापतींनी नोटीस बजावली आहे. सर्व बंडखोर आमदारांना 27 जून, सायंकाळी 5:30 पर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

 

जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार, बंडखोर आमदारांनी प्रतिसाद न दिल्यास त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही, असे मानले जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रियेनुसार कारवाई केली जाईल.

 

त्याचवेळी बंडखोर आमदार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची नोटीसही शिवसेनेने बजावली आहे.
त्यांना लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह गुवाहाटीत आश्रय घेतला आहे.

कार्यकारिणीच्या बैठकीत चार ठराव मंजूर
शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना कायम राहील,
असे ठरावांमध्ये सांगण्यात आले. बैठकीत सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
तसेच निर्णय घेण्यात आला की, बाळासाहेबांच्या नावाचा गैरवापर होऊ नये, यासाठी शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाईल.

 

शिंदे आधी नाथ होते, आता गुलाम झालेत : उद्धव ठाकरे
त्याचवेळी सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे आधी नाथ होते, आता गुलाम झाले आहेत.
शिंदे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वडिलांच्या नावाने मते मागून दाखवावी.
दुसरीकडे या राजकीय पेचप्रसंगात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | eknath shinde likely meets devendra fadnavis in vadodara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’; आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक शब्दात टीका

 

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह ‘या’ परिसरात रविवारी वीजपुरवठा बंद राहणार

 

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त रिचार्ज, 1 महिन्यापर्यंत फ्रीमध्ये होईल Calling आणि मिळेल Data