Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदार संजय शिरसाट पुन्हा आक्रमक; म्हणाले – ‘शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील अभुतपूर्व परिस्थिती (Maharashtra Political Crisis) निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना (Shivsena) आक्रमक झाल्याचे दिसते. तर दुसरीकडे शिंदे गटही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) थेट आरोप केले आहेत. ‘शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेय,’ असा आरोप त्यांनी केला.

 

संजय शिरसाट म्हणाले, “शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह निर्माण करुन राष्ट्रवादी मजा बघत आहे. सध्या शिवसेनेत जो कलह निर्माण झाल्याय त्यावरुन शिवसैनिकांनी आपआपसांत भांडू नये, एकमेकांची डोकी फोडू नका, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, राज्यात बैठकांचं सत्र सुरू असल्याचं सांगितल्यानंतर गुवाहाटीमध्ये देखील आमच्या बैठका चालू आहेत.” असं त्यांनी सांगितलं आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दरम्यान, नुकतंच संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये ते म्हणाले होते की, “गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी ‘वर्षा’चे दारे बंद होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. आमच्यासाठी मंत्रालयातील ६ व्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी कधीच आपल्यापर्यंत पोहोचू दिली नाही.”

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | eknath shinde shivsena mla sanjay shirsath maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Tanaji Sawant | शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले – ‘हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू’