Maharashtra Political Crisis| ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा! निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नाही; कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis| शिवसेना (Shivsena) कोणाची? पक्ष चिन्ह (Party Symbol) कोणाचे आणि शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज चारही बाजूंनी जोरदार युक्तिवाद (Maharashtra Political Crisis) करण्यात आला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तींची एकमेकांसोबत चर्चा केली. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, तर एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) मोठा दिलासा दिला आहे.

निवडणूक आयोगाला (Election Commission) सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे. सकाळपासून शिवसेनेचा ठाकरे गट हा निवडणूक आयोगाला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सिब्बल (Advocate Kapil Sibal) यांनी त्या दिशेनेच युक्तिवाद केला होता. शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेच आहेत, निवडणूक चिन्हही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता यावर निर्णय घेणार आहे. (Maharashtra Political Crisis)

शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल,
असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय घेण्यापासून रोखावं,
अशी मागणी केली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी मान्य न केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती नसेल,
असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Justice Dhananjay Chandrachud) यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने सुनावणी अंती दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं.

Web Title :- Maharashtra Political Crisis | eknath shinde vs shivsena in supreme court shock to uddhav thackeray election commission is free to proceed on the party symbol descision of supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Amol Mitkari | ते बंडखोर 16 आमदार अपात्र ठरणार का?, सर्वत्र चर्चा सुरू असताना अमोल मिटकरींचे सूचक ट्विट,…तर शिंदे सरकार दसर्‍यापूर्वीच कोसळेल

Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी