Maharashtra Political Crisis | राज्यपालांकडून एकनाथ शिंदे गटासाठी पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर अपेक्षेनुसार पुढील सर्व हालचाली राजभवनातून होणार अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्याच दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाल्याने ते रूग्णालयात दाखल झाले आणि शिंदे गटाची कोंडी झाली. मात्र, आता कोश्यारी हे राजभवनात परतले असून त्यांनी आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. बंडखोर आमदारांना पोलीस संरक्षण द्यावे असे पत्र कोश्यारी यांनी मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai CP) आणि महासंचालकांना दिले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परतल्यानंतर तिकडे बंडखोर शिंदे गटाच्या हालचाली सुद्धा वाढल्या आहेत. दुपारी शिंदे गटाची एक महत्वाची बैठक झाली असून त्यामध्ये पुढील वाटचालीचे नियोजन करण्यात आल्याचे समजते. राजभवनात आल्यानंतर आता राज्यपालांनी कामकाजाला सुरूवात केली आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई पोलीस आयुक्त पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांना आणि पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यपाल यांना सुरक्षेबाबत पत्र लिहून मागणी केली होती. (Maharashtra Political Crisis)

 

धास्तावलेल्या बंडखोरांना केंद्राने दिली सुरक्षा

मोदी सरकारने शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांच्या घरांच्या बाहेर सीआरपीएफचे जवान तैनात केले आहेत.
अमित शाहांच्या गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

राज्यात शिवसैनिक आक्रमक झाल्याने गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार चिंताग्रस्त झाले आहेत.
त्यांच्या येथील कार्यालयांवर संतप्त शिवसैनिक हल्ले करत आहेत. यामुळे बंडखोर आमदारांना त्यांच्या कुटुंबियांची देखील चिंता वाटत असून राज्यात परतण्यासाठी सुद्धा भीती वाटू लागली आहे.

काल दीपक केसरकर यांच्या घरावर हल्ला झाला. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
एकनाथ शिंदेच्या मुलाच्या कार्यालयावर सुद्धा हल्ला करण्यात आला.

यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 15 आमदारांच्या निवासस्थानांना संरक्षण पुरवले आहे.
आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

आमदार सदा सरवणकर, रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनावणे, प्रकाश सुर्वे यांच्यासह आणखी 9 जणांच्या घराबाहेर सीआरपीएफचा बंदोबस्त तैनात केला आहे.
विशेष म्हणजे ज्या आमदारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे त्यांनाही केंद्राकडून संरक्षण मिळाल्याने सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | governor Bhagat Singh Koshyari wrote a letter to the mumbai police commissioner for the eknath shinde group

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा