Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत भाजप नेत्याचं सूचक ट्विट; म्हणाले – ‘मी पुन्हा येईन…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात संघर्ष (Maharashtra Political Crisis) निर्माण झाला आहे. शिंदे गटात अपक्षांसह 50 इतके आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्यात सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. अशातच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलं आहे.

 

सूरत येथे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत मोहित कंबोज यांचे फोटो समोर आले होते. त्यानंतर गुवाहाटीतही मोहित कंबोज या आमदारांसोबत असल्याचं समजते. मोहित कंबोज यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक फोटो शेअर करत सूचक ट्विट केलं आहे. त्यामध्ये फडणवीसांनी विधानसभेत म्हटलेली शायरीचा उल्लेख आहे. “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना. मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा” असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दरम्यान, या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना (Shivsena) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) अस्वस्थता पसरली आहे.
त्यामुळे एकीकडे भाजपने बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गट देखील सत्ता स्थापनेसाठी हालचाली करत आहेत.
सध्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला हादरा दिला आहे.
शिवसेनेचे तब्बल 39 आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
भाजपासोबत सरकार बनवावं अशी आग्रही मागणी या गटाने केल्याने राज्यातील राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | i will come again mohit kambojs suggestive tweet tweeting a photo of devendra fadnavis maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचं मोठं विधान

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर

 

Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत 160 GR; राज्यपाल कोश्यारींनी मागितला ठाकरे सरकारकडे खुलासा