Maharashtra Political Crisis | ‘मी एकनाथ शिंदे यांचा पठ्ठा, पोस्टर फाडणाऱ्यांना सोडणार नाही’; राजेश क्षीरसागर यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना (Shivsena) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात राजकीय संघर्ष (Maharashtra Political Crisis) वाढल्याचं दिसत आहे. दरम्यान राज्यभर बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही जिल्ह्यात शिंदे गटातील आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड आणि पोस्टर फाडण्यात येत आहे. हे पाहता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) चांगलेच संतापले असल्याचे दिसले.

 

शिवसेनेच्या पोस्टरवरील फोटो फाडल्याने राजेश क्षीरसागर संतापले आहेत. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांनी माजी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले (Ravikiran Ingwale) यांना गुवाहाटीमधून इशारा दिला आहे. राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने रविकिरण इंगवले आक्रमक झाले आहेत. इंगवले यांनी शिवसेनेच्या पोस्टरवरील राजेश क्षीरसागर यांचा फोटो फाडला आहे. या सर्व प्रकारावर बोलताना राजेश क्षीरसागर यांनी “मी एकनाथ शिंदे यांचा पठ्ठाआहे. पोस्टर फाडणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराच दिला आहे.

 

दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात सेनेला मोठे खिंडार पडले आहे.
त्यामुळे कोल्हापूर शिवसैनिकांकडून राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडण्यात आले. पक्षप्रमुखांचा आदेश, पुन्हा नाही राजेश अशा घोषणही यावेळी देण्यात आल्या.
या पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर चांगलेच संतापले असल्याचे दिसले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | ‘I will not leave those who tear Eknath Shinde’s plates, posters’; Rajesh Kshirsagar’s warning

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde On Sharad Pawar | एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो’

 

Balkrishna Industries Ltd | 1 रुपयावरून 2100 च्या पुढे गेला टायर कंपनीचा शेअर, 1 लाखाचे झाले 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त

 

Maharashtra Political Crisis | ‘गद्दारांना वेचून वेचून धडा शिकवणार’ – शिवसेना