राज्यात सत्ता स्थापनेवरुन अस्थिरता, ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाल्यास काय होईल ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेलाच नाही, विधानसभेचा कालावधी संपण्यास काही तास शिल्लक राहिले असताना आता चर्चा सुरु झाली आहे ती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या शक्यतेची. जे ठरलं होतं तसंच व्हावं ही शिवसेनेची भूमिका अजून तशीच असून मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे.

राज्यात महायुतीला जनतेचा कौल मिळाला असला तरी अजून भाजप शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन तिढा कायम आहे. त्यामुळे येत्या काळात सकारात्मक घडामोडी न घडल्यास सरकार कोण स्थापन करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतू हा तिढा सुटला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सत्तेस्थापना हा कळीचा मुद्दा झाला आहे.

राष्ट्रपती राजवट काय असते –

भारतीय राज्यघटनेत 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत.

1. राष्ट्रपती आणीबाणी

2. आर्थिक आणीबाणी

3. राष्ट्रपती राजवट

कलम 356 नुसार राज्यातील प्रशासन सुव्यवस्थेत नसल्यास राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे. ज्या राज्यातील सरकार केंद्राच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत आहेत तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतला जातो, राज्यपाल राष्ट्रपतींकडे राज्यातील परिस्थितीचा अहवाल देतात त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात येते.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्याला संसदेची मान्यता आवश्यक असते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 6 महिने राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतू संसदेने पुन्हा एकदा 6 महिन्यापर्यंत मान्यता दिल्यास हा कालावधी वाढू शकतो. राष्ट्रपती राजवट पुढील 3 वर्षांपर्यंत कायम करता येते.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास काय होईल –

एकदा का राष्ट्रपती राजवट लागू झाली तर राज्याचा सर्व कारभार राष्ट्रपतीच्या हाती जातो. त्यांच्यामार्फत राज्यपाल राज्याचा कारभार पाहतात. राज्याच्या मुख्य सचिवांना हाताशी घेऊन राज्यपाल राज्याचा कारभार पाहत असतात.

राज्यविधीमंडळाची कामे देखील संसदेकडे सोपवण्यात येतात. राष्ट्रपती कोणत्याही अधिकाऱ्यांकडून कामे करु घेऊ शकतात. त्यानंतर राज्याच्या निधीतून पैसे खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपतीकडून देण्यात येतात. यासाठी राष्ट्रपती प्रासंगिक व्यवस्था करुन घोषणांची पुर्तता करतात.

महाराष्ट्रात कधी लागू होती राष्ट्रपती राजवट –

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास ही पहिली घटना नसेल. याआधी दोनदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. पहिली राष्ट्रपती राजवट 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत लावण्यात आली होती. त्यानंतर 32 दिवसांची राष्ट्रपती राजवट 2014 साली लागू करण्यात आली होती.

Visit : Policenama.com