Maharashtra Political Crisis | विधानसभा अध्यक्षांचे सूचक विधान; म्हणाले – ‘लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालानंतर आमदार अपात्रतेचा (शिंदे गट – Shinde Group) निर्णय आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Adv Rahul Narvekar) काय निर्णय घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. ‘मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन,’ असे विधान नार्वेकर यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले, की मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार, असे सूचक वक्तव्य राहुल नार्वेकरांनी केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. (Maharashtra Political Crisis)

यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले, बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन.
आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार. बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत
भाष्य करताना नार्वेकर यांनी हे वक्तव्य केले आहे. पुढे ते म्हणाले, की 1977 साली माझा जन्म झाला आणि याच
साली स्वर्गीय बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
बाळासाहेब देसाईंनी ज्याप्रमाणे अनेक क्रांतिकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यावर घेतले,
त्यातूनच शिकून कदाचित मीदेखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन.

दरम्यान, दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी नार्वेकर यांनी केलेले
भाषण हे सत्तासंघर्ष न्यायालयाच्या निकालानंतर आमदारांच्या निलंबन संदर्भातील प्रकरणाचा अप्रत्यक्ष संकेत आहे.
राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Web Title :  Maharashtra Political Crisis | Maharashtra Assembly Vidhan Sabha Speaker Adv Rahul Narvekar on maharashtra political crisis will soon make revolutionary decision shivsena bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Maharashtra Politics News | ‘अफझल खान असेल किंवा औरंगजेब, छत्रपतींच्या महाराष्ट्रात…’, नगरमधील ‘त्या’ घटनेवरुन अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात