Maharashtra Political Crisis | राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार ! काँग्रेसचा एक गट फुटणार ? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची शिंदे कॅबिनेटमध्ये लागणार वर्णी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. आता पुन्हा एकदा राज्यात मोठा भूकंप होण्याची (Maharashtra Political Crisis) शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते (Congress Leader) शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Govt) पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे माजी मंत्री शपथ घेऊ शकतात.

 

येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता (Maharashtra Political Crisis) आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र काँग्रेस मधील (Maharashtra Congress) खळबळ विधानपरिषद निवडणुकीपासून (Legislative Council Election) दिसली आहे. काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालापासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील गट फुटून शिंदे गटात (Shinde Group) सामिल झाला तर काँग्रेसमधील काही माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

 

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. हे सर्व भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचंही समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी भाजपला मतदान केलं. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला होता. शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या (Floor Test) वेळीही काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते. यात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचाही समावेश होता. तेव्हापासूनच काँग्रेस आमदारांच्या नाराजीबाबतचं वृत्त समोर येत होतं.

 

23 मंत्री शपथ घेणार ?

राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.
सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात.
त्यानुसार राज्यात एकूण 43 मंत्री करता येतात. यापैकी 20 मंत्री सध्या असून आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते.
यात भाजप-सेनेच्या आमदारांना पुढील विस्तारामध्ये संधी मिळू शकते.
हा विस्तार येत्या काही दिवसांत लवकरच होऊ शकतो, असंही मुनगंटीवार म्हणाले.

 

Web Title : –  Maharashtra Political Crisis | maharashtra congress mlas are likely to get a ministry in the eknath shinde cabinet expansion devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा