Maharashtra Political Crisis | ‘मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी महाराष्ट्रातून लवकर काढता पाय घ्यावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | अलीकडेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले. अद्यापही राज्यातील राजकारण तापलेले पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यपालांवर सडकून (Maharashtra Political Crisis) टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी महाराष्ट्रातून लवकर काढता पाय घ्यावा, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळे भारताचे नाव जगात उंचावले जात असल्याचा भाजपच्या (BJP) दाव्यावरुनही अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यपालांवरही बोचरी टीका केली. नरेंद्र मोदींच्या आधी भारताला ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), महात्मा गांधी (Mahatma Gandhi), सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose), डॉ. राजेंद्र प्रसाद (Dr. Rajendra Prasad), पं. जवाहरलाल नेहरू (Pt. Jawaharlal Nehru) यांच्या सारख्या नेत्यांच्या विद्वत्तेमुळे जगभराने भारताला मुजरा केला आहे. मोदींचे एजंट बनलेल्या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रातून लवकर काढता पाय घ्यावा, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दुसऱ्या एका ट्विटमध्ये, महाराष्ट्राने आजवर 21 राज्यपाल बघितले त्यातील पहिले राज्यपाल श्रीप्रकाश (Sriprakash) अत्यंत सुसंस्कृत होते आणि तीच परंपरा पुढे सुरु राहिली.
मात्र 21 वे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागील सुसंस्कृत राज्यपालांच्या परंपरेला पार धुळीस मिळवले आहे.
या महोदयांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असेही मिटकरी यांनी म्हटले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | maharashtra ncp amol mitkari criticized governor bhagat singh koshyari over his statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा