Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत 40 आमदरांनी शिवसेना (Shivsena) पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरु आहे. यावर अखेर सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) आज सुनावणी पार पडली. आजची सुनावणी थोडक्यात आवरली असून 29 नोव्हेंबरला या संदर्भात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षची सुनावणी चार आठवडे लांबणीवर गेली आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने (Constitution Bench) दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. दोन्ही बाजूने कोणते मुद्दे मांडण्यात (Maharashtra Political Crisis) येतील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहिती देखील देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षावर हक्क सांगितला असून पक्ष चिन्हाची लढाई निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी आधी झालेल्या सुनावणीत ‘खरी शिवसेना कोणाची’ याचा निवाडा केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) करेल, असं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटलं होतं. पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत (MLA Disqualification) आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण (Maharashtra Political Crisis) झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. आजची सुनावणी थोडक्यात आवरली असून 29 नोव्हेंबरला या संदर्भात सुनावणी होणार आहे.

आज कोर्टात काय घडलं?

सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती
(Information in Writing) देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील सुनावणी सुरु करण्याआधी दोन्ही
बाजूने एकत्रितपणे आपले मुद्दे सादर करावे असे घटनापीठाने म्हटले. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील या बाजू
मांडू शकतात. शक्य असल्यास दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत.
हे मुद्दे मोजकेच असावेत असेही कोर्टाने म्हटले आहे.

दोन्ही बाजूने कोणत्या मुद्यावर कोणते वकील युक्तिवाद करतील हे देखील निश्चित करण्यास सुप्रीम कोर्टाने
सांगितले आहे. जेणेकरुन युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाही.
लिखित स्वरूपात मुद्दे दिल्याने घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास मदत होते.
असेही कोर्टाने म्हटले.

Web Title :-  Maharashtra Political Crisis | maharashtra politics constitution bench direct to uddhav thackeray faction and eknath shinde faction to submit written submission matter hear after 4 weeks

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

India Squad NZ Series | न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे देण्यात आहे कर्णधारपद

Gas Cylinder Price | महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची कपात