Maharashtra Political Crisis | ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक धक्का; राज्यपालांना 12 उमेदवारांची नवी यादी पाठवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेत बंड करुन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेल्या धक्क्यातून (Maharashtra Political Crisis) शिवसेना सावरत नाही तोच ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत.

 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी 12 आमदारांची (12 MLA) यादी मंजूर केली नव्हती. मात्र आता राज्यात नवं सरकार आलं आहे. या नवनिर्वाचित सरकारकडून आता राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी नावे पाठवली जाणार आहेत. (Maharashtra Political Crisis)

 

राज्यपालांनी मागील दीड-दोन वर्षापासून शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) 12 उमेदवारांची यादी विधान परिषद (Vidhan Parishad) आमदारकीसाठी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी त्यावर आक्षेप घेत ही यादी तशीच ठेवली होती. यावरुन मोठे राजकारण झाले होते. राजीनाम्याची घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लोकशाहीवरुन टोमणा मारताना आतातरी 12 आमदारांची यादी मंजुर करावी, असे म्हटले होते. आता शिंदे सरकार स्वीकृत सदस्यांची नवीन यादीच पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

राज्यपालांना विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत 12 आमदार नियुक्त (Governor Appointed MLA) करण्याचे अधिकार असतात.
या विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा हा सभागृहाला व्हावा, असा हेतू या नियुक्ती मागे असतो.
आता लवकरच राज्य सरकारकडून 12 जणांची यादी पाठवली जाणार आहे.
त्यामुळे या यादीत कोणाची नावं असणार याकडे सर्व इच्छुक मंडळींच लक्ष असणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | maharashtra state government will give 12 governor appointed mla list to governor bhagat singh koshyari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

 

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त प्रीमियम देणारे राज्य बनले यूपी, महाराष्ट्र आणि बंगाल मागे नाही

 

Assembly Speaker Election | कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे?, काँग्रेसचा सवाल; साधला राज्यपालांवर निशाणा (व्हिडिओ)