Maharashtra Political Crisis | ”बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे…’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | आघाडी सरकारमधील मंत्री आणि सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडाळीमुळे शिवसेनेला धक्का तर आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची (Maharashtra Political Crisis) चर्चा आहे. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ‘बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नसल्याचं,’ अजित पवार म्हणाले. आम्ही सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) पाठिशी असून आज संध्याकाळी त्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

 

“राष्ट्रीय विषयावर काही भाष्य करणार नाही,” असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल. तसेच, विधीमंडळाबाबत काही निर्णय असतील तर ते अध्यक्ष घेतील असं ते म्हणाले. एनडीएचे सरकार सत्तेत असताना 25 पक्ष सोबत होते, त्यानंतर यूपीएचे सरकारही अनेक पक्षांनी मिळून बनले होते. अजित पवार महाराष्ट्राच्या संदर्भात काही असेल तर ते बोलतो, बाकीचा राष्ट्रीय विषय असेल तर ते पवार साहेब, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) बोलतील,” असं ते म्हणाले.

 

“गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रावर जी काही संकटे आलीत. त्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केलं आहे.
कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून उद्धव ठाकरेंचा समावेश टॉपच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत होता.
त्यामुळे या काळात महाविकास आघाडीने चांगलं काम केलं आहे.” असं अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | ncp ajit pawar reaction on shivsena eknath shinde rebellion maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा