Maharashtra Political Crisis | हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणार्‍या आमदार रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज – अमोल मिटकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू आणि रवी राणा यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात असताना या दोघांनाही डावलण्यात आले आहे. यामुळे बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्ती केली आहे, तर रवी राणा सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रवी राणा यांना खोचक शब्दात चिमटा काढला आहे.

 

तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या आंदोलनावरून मोठे वादळ उठले होते.
शिवसैनिक देखील संतप्त झाले होते. नंतर काही दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता.
त्यावेळी भाजपने राणा दाम्पत्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता.
याच हनुमान चालीसा पठणाचा संदर्भ देत अमोल मिटकरी यांनी रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्याने खिल्ली उडवली आहे.

 

अमोल मिटकरी यांनी म्हटले की, हिंदुत्वासाठी जीवाचे रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालुन फिरणारे रवी राणा, अखेर वैफल्यग्रस्त झालेत.
देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्रीपद मिळते याचा अर्थ त्यांना नव्याने ‘देवेंद्र चालीसा‘ वाचण्याची गरज आहे.
रवी राणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे.

 

दरम्यान, मंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चेवरून रवी राणा यांनी म्हटले आहे की,
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ऑनलाईन सरकार चालवले.
मात्र आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मजबूत सरकार आले आहे.
मी कधीही मंत्रिपद मागितले नाही आणि मी नाराजही नाही.

 

राणा यांनी पुढे म्हटले की, कुठल्याही अपक्ष आमदाराने नाराज व्हायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना अमरावती जिल्ह्याची जाण आहे.
ते योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड अमरावतीमधून मंत्री आणि पालकमंत्री म्हणून करतील.
अमरावती जिल्ह्याला कोण योग्य न्याय देऊ शकतो याची फडणवीस यांना चांगली कल्पना आहे,
ते योग्य व्यक्तीची लवकरच निवड करतील.

 

Web Title : –  Maharashtra Political Crisis | ncp amol mitkari criticized ravi rana over not included in cabinet of eknath shinde and devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा