Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे एकनाथ शिंदे नेतेपदी कायम, शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | पक्षातील बंडाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक (Shiv Sena National Executive Meeting) झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पक्षातील बंड मोडून काढण्यासाठी पावले (Maharashtra Political Crisis) उचलण्यात आली. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर कारवाई केली जाईल अशी चर्चा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई केलेली नाही. एकनाथ शिंदे अजूनही शिवसेनेच्या नेतेपदी कायम राहतील. त्यामुळे शिवसेना अद्यापही वेट अँड वॉचच्या (Wait & Watch) भूमिकेत आहे.

 

कार्यकारिणीच्या बैठकीत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना नेते पदावरून दूर सारलं जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, कार्यकारिणीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झाला नाही. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना अभय देण्यात आलं.(Maharashtra Political Crisis)

 

शिवसेनेत नेतेपद, सचिव पद अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दोघांनाही नेते पदावरून हटवणं हा टोकाचा निर्णय आहे.
जर त्यांच्यावर कारवाई करत नेतेपदावरुन हकालपट्टी केली असती, तर शिंदे गटाचे परतीचे दोर कापले गेले असते.
त्यामुळेच त्यांना नेतेपदावर कायम ठेवून वेट अँट वॉच अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray)
यांच्यासह कार्यकारिणीतील सहकाऱ्यांनी घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम वगळता इतर नेते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत.
या बैठकीत अनंत गीते (Anant Geete) हे पूर्वपरवानगीने अनुपस्थित होते.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | no action has been taken against eknath shinde shiv sena in wait and watch mode

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde On Sharad Pawar | एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो’

 

Balkrishna Industries Ltd | 1 रुपयावरून 2100 च्या पुढे गेला टायर कंपनीचा शेअर, 1 लाखाचे झाले 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त

 

Maharashtra Political Crisis | ‘गद्दारांना वेचून वेचून धडा शिकवणार’ – शिवसेना