Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले – ’35 नव्हे 40 आमदार माझ्यासोबत, आणखी 10 येतील”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | मंगळवारी सकाळपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना (Maharashtra Political Crisis) दिसत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या एकनाथ शिंदेसह आमदार आसामच्या गुवाहटीत (Guwahati) दाखल झाले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. “माझ्यासोबत केवळ 35 नाही, तर 40 शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच, आणखी 10 आमदार सोबत येणार आहेत,’ असा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

 

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील. माझ्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार आहेत आणि आणखी 10 आमदार सोबत येणार आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी मध्ये दाखल झाले आहेत.
आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पण एकनाथ शिंदे अजूनही भाजपासोबत सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम आहेत.
त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे.

कालच एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची फोनवर चर्चा झाली.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. पण एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचं एक आव्हानच एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | not 35 but 40 shivsena mlas with me
10 more will come eknath shinde Maharashtra Political Crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा