Maharashtra Political Crisis | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत उध्दव ठाकरेंना 4 वेळा सांगितलं होतं ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांनी तब्बल 39 आमदारांना घेऊन शिवसेनेमध्ये बंड पुकारले. एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाराष्ट्रात खळबळ (Maharashtra Political Crisis) उडाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना याची माहिती कशी नव्हती ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी चार वेळा बंडखोरी (Rebel) होणार असल्याची माहिती दिली होती, अशी माहिती समोर येत आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले आहे.
एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन सुरत आणि तेथून गुवाहाटी येथे मुक्कामी गेले होते.
मध्यंतरी हे बंड शिवसेनेकडूनच प्रायोजित असल्याची चर्चा सोशल मीडियावर (Maharashtra Political Crisis) रंगली होती.
परंतु खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाद्दल माहिती होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार वेळा शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे बंडखोरी करणार आहेत, अशी माहिती दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्याकडून सहा वेळा पक्षात बंडखोरी होणार असल्याची माहिती दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर आले आहे.
याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ते राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.
आजच देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथ विधी होण्याची शक्यता आहे.
तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | sharad pawar had told uddhav thackeray about eknath shindes rebellion 4 times

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा