Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्षातील फूटीनंतर शिवसेना (Shivsena) पक्षात दोन गट पडले. खरी शिवसेना कुणाची? यावर सध्या निवडणुक आयोगासमोर (Election Commission) महत्वाची सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. याअगोदरच्या दोन सुनावण्यांदरम्यान दोन्ही गटांच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दि. २३ जानेवारीच्या सुनावणी वेळी निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना आपली भूमिका लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले. त्यासाठीची मुदत आज संपत आहे. आज (दि.३०) दोन्ही गटांकडून लेखी स्वरूपात आपापली भूमिका मांडली जाईल. त्यानंतर याबातचा निर्णय लवकरच निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात येईल. अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Political Crisis)

 

आज होणाऱ्या सुनावणीवर बोलताना जेष्ठ विधिज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) म्हणाले की, ‘निवडणूक आयोगसमोर शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? हा खटला सुरु आहे. तर त्याहून महत्त्वाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. पक्षांतर बंदी कायदा शेड्यूल १० नुसार योग्य अर्थ लावून निलंबनाबाबत काय निर्णय घ्यायचा यावर सर्वोच्च न्यायालयात काम सुरु आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल दिला तर तो कदाचित चुकीचा ठरू शकतो. मला व्यक्तिगत असं वाटतं की, निवडणूक आयोगाने निकालाची प्रक्रिया सुरु केली असली तरी अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी देऊ नये.’ असे मत त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. (Maharashtra Political Crisis)

दरम्यान, राज्यात पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा निकाल महत्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. तसेच शिवसेना पक्षाचे अध्यक्षपद सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आहे. त्यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदत २३ जानेवारीला संपली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवून मिळणार की निवडणुक आयोग त्यांना पक्षांतर्गत निवडणुक घेण्याची परवानगी देणार? हे देखील पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shinde and thackeray group legal battle
constitutional expert ulhas bapat comment on election commission result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा