Maharashtra Political Crisis | शिवसेना, विश्वासघात अन् काँग्रेस; तेव्हा वसंतसेना म्हणून शिवसेनेला हिणवले जायचे

मुंबई : Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून फुटून वेगळा गट स्थापन केला. भाजपबरोबर सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजप (BJP) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार तुटून पडत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांना माझ्या प्रिय हिंदु बांधवांनो आणि भगिनीनो म्हणण्याचा अधिकार नाही, असे मनसेचे (MNS) नेते म्हणत आहे. शिवसेनेने काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसशी सलगी करीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करुन हिंदुत्वाशी तडजोड केली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांनी काँग्रेसवर केलेल्या टिकेची भाषणे दाखविली जात आहे. पण, शिवसेनेने आताच काँग्रेसशी जवळीक साधली असे नाही तर यापूर्वी अनेकदा काँग्रेसशी जवळीक साधत आपला कार्यभाग साधून घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या काळात तर शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिणविले जात असे. नव्या पिढीला हा इतिहास कदाचित माहिती नसेल. (Maharashtra Political Crisis)

मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेची १९६६ मध्ये स्थापना केली गेली. शिवसेना हा पक्ष स्थापनेपासून काँग्रेसचा विरोधक राहिला असला तरी गेल्या ५६ वर्षात अनेकदा शिवसेना आणि काँग्रेस हे जवळ आले आहेत.

मुंबईत डावे पक्ष आणि शेकाप यांची ताकद वाढत होती. गिरणी कामगारच नाही तर सर्व उद्योगव्यवसायात कामगार संघटना आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा दबदबा वाढत चालला होता. ही काँग्रेसपुढे डोकेदुखी झाली होती. त्याचवेळी शिवसेनेचा उदय झाला होता. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी डाव्यांना शह देण्यासाठी शिवसेनेला खतपाणी घातले. नाईक यांनी उघडपणे शिवसेनेची पाठराखण केली. त्यामुळे तेव्हा विनोदासाठी अनेकदा शिवसेनेला वसंतसेना म्हटले जायचे. वसंतराव नाईक यांच्याशी असलेल्या जवळकीमुळे शिवसेनेला हे टोपणनाव मिळाले होते. काँग्रेसच्या वेगवेगळ्या गटाकडून, नेत्यांकडून वेळोवेळी शिवसेनेला प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला. सुरुवातीच्या काळात रामराव आदिक आणि बाळासाहेब देसाई यांची शिवसेनेला सहानुभुती होती. काँग्रेस घराण्यातील त्यांचेच नातू शंभुराज देसाई हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. आता शिंदे गटात गेले आहेत. (Maharashtra Political Crisis)

आणिबाणीच्या काळात सर्व विरोधकांना डावलून पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन केले होते. १९७८ मध्ये जनता सरकारने जेव्हा इंदिरा गांधी यांना अटक केली. तेव्हा त्याविरोधात शिवसेनेने बंदही पुकारला होता.

याच काळात १९७७ मध्ये काँग्रेसचे नेते मुरली देवरा यांना मुंबईचे महापौर बनविण्यासाठी शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला होता.

त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी बॅ. अंतुले यांचे अनेकदा जाहिरपणे कौतुक केले होते. काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे ३ आमदार विधान परिषदेवर निवडून गेले होते.

सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील यांच्या नावाची घोषणा केली. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी भाजपशी युती असतानाही मराठी माणूस राष्ट्रपती होणार म्हणून प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांना पाठिंबा दिला होता.

त्यानंतर २०१२ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) हे काँग्रेस आघाडीचे
उमेदवार होते. भाजपने पी ए संगमा यांना पाठिंबा दिला होता.
शिवसेनेची मते निर्णायक ठरणार होती. तेव्हा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रणव मुखर्जी यांना
घेऊन मातोश्रीवर गेले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा मिळविला होता.
तेव्हा भाजपच्या विरोधाला न जुमानता मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता.
तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा दराराच इतका मोठा होता की भाजपला हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
शिवसेनेचा विस्तार हा काँग्रेसच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे राज्यभर झाला आहे.
हा इतिहास पाहता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करुन वेगळे काही केले नाही. (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेने हिंदुत्व सोडले, शिवसेनेने विश्वासघात केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, पण,
हे अर्धसत्य आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन एकमेकांची अडवणूक सुरु होती.
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असली तरी युती तोडली नव्हती.
त्यांच्यात बोलणी सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना घेऊन पहाटेचा तो गाजलेला शपथविधी उरकला होता.
यापूर्वीही २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपकडे संख्याबळ नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.
शिवसेनेने काँग्रेसशी घरोबा केला तर हिंदुत्व सोडले, असा आरोप भाजपकडून केला जातो.
पण भाजपने त्याअगोदर वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळविणी केली.
तेव्हा शिवसेनेशी विश्वासघात होत नाही की हिंदुत्वावर आच येत नाही.
फक्त शिवसेनेने काँग्रेसशी जुळवून घेतले की हिंदुत्वावर आच येते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title :- Maharashtra Political Crisis | Shiv Sena and Congress; At that time Shiv Sena was known as Vasant Sena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | गेल्या अडीच वर्षांत PMRDA क्षेत्रात 3 हजार अनधिकृत बांधकामे

Pune Accident News | पुण्यातील MIT कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू, नारायणगाव येथील घटना

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार