Maharashtra Political Crisis | ‘या’ कारणामुळं शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | काल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या (Shivsena) अजय चौधरी आणि सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांची नियुक्ती रद्द ठरवत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजय गोगावले यांची निवड योग्य ठरवली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavle) यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. पक्षाच्या 16 आमदारांनी आदेशाविरोधात मतदान केल्याचे पत्रात म्हटले आहे. शिंदे गटाने हे पाऊल उचलल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

विधानसभेच्या विशेष अधिवेशन सत्राच्या कालच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. यावेळी शिवसेनेने व्हीप विरोधात 39 आमदारांनी मतदान केले असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर आधीच्या पिठासीन अधिकार्‍यांनी व्हीपच्या विरोधात 39 मतदारांनी मतदान केल्याचे सभागृहात रेकॉर्डवर आणले होते.

 

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर आसनावर आले. त्यावेळी त्यांच्यासमोर कुठलाही नवीन व्हीप नव्हता. मात्र, तरीही त्यांनी पुन्हा त्याच व्हीपच्या आधारे कारवाई करणे हे असंवैधानिक असल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

व्हीपच्या मुद्द्यावरून शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार आहे.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार आहे.
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेकडून अभिषेक मनु सिंघवी हेच युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shiv sena in supreme court petition against cancellation of group leadership and whip

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा