Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या आमदारांच्या नाराजीचे कारण आलं समोर, राष्ट्रवादी व काँग्रेसवर केले आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मागील अडीच वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेसमोर (Shivsena) मोठं संकट उभा ठाकले आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांना घेऊन बंड (Maharashtra Political Crisis) पुकारले आहे. मात्र आता या आमदारांच्या (MLA) नाराजीचे कारण समोर आलं आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ (Shiv Sena MLA Sanjay Shirsath) यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आरोप केले आहेत. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदारांना मारहाण केल्याचा दावा शिरसाट यांनी फेटाळला आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाचे 33 आमदार फोडून आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्यामुळे (Maharashtra Political Crisis) शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपली भूमिका मांडत आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर खापर फोडले आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही 35 आमदार आणि इतर अपक्ष आमदार (Independent MLA) सोबत आहोत. अजूनही आमदार गुवाहाटीत येत आहेत. संध्याकाळपर्य़ंत हा आकडा 40 पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. आमची नाराजी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर आहे. नेतृत्वावर नाराजी अजिबात नाही. आता भाजपसोबत (BJP) जायचं की, दुसरा गट स्थापन करायचा याचा निर्णय हे एकनाथ शिंदे घेणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.

तसेच मागील अडीच वर्षामध्ये यावर बोलणार होतो, पण कोविड काळ गेला, त्यात मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नव्हती.
त्यामुळे आम्ही काही बोललो नाही, असंही शिरसाठ म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी शिवसेनेच्या आमदारांना मारहाण (Beating) केल्याचा आरोप केला आहे. पण कोणत्याही आमदाराला मारहाण झाली नाही. आमदारांना मारहाण कशी होऊ शकते. लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना कुणीही हात लावलेला नाही. संजय राऊत यांना ही माहिती कुठून मिळाली हे माहित नाही, असेही शिरसाठ म्हणाले.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला सभागृहात दोन तृतांश संख्याबळ सिद्ध करता आले
तर राज्यपाल हे शिंदेंच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देऊ शकतात.
तर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) समर्थक आमदार हे एक वेगळा गट बनून राहू शकतात,
अशी माहिती ख्यातनाम घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी दिली.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shiv sena mla sanjay shirsath made allegations against congress and ncp Maharashtra Political Crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

 

Constipation | बद्धकोष्ठतेचा त्रास आहे का?, मग या ३ पदार्थांपासून दूर राहा अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल!

 

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून मोठ्या कारवाईला सुरुवात