Maharashtra Political Crisis | खासदार राऊतांचं थेट आव्हान, म्हणाले – ‘एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागली, पण मी भाजपला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | पक्षाचे झालेले नुकसान आणि बंडखोरीमुळे सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने शिवसेना (Shivsena) सातत्याने बंडखोर शिवसेना नेते (Shivsena Rebel Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपाला (BJP) लक्ष्य करत आहे. आता शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला आव्हान (Maharashtra Political Crisis) दिले आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची (CM) तात्पुरती हौस भागली आहे. मात्र, यामागे भाजप असून, शिवसेना संपवण्याचा डाव यशस्वी होणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी दिला आहे.

 

पत्रकारांशी बोलताना विनायक राऊत यांनी म्हटले की, हा भाजपचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे काही कायम स्वरूपी नाही. फक्त एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले इतर 39 आमदार गेल्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे जरी नुकसान झाले असले, तरी शिवसेनेचा मूळ ढाचा कुठेही ढासळलेला नाही. (Maharashtra Political Crisis)

 

भाजपाला आव्हान देताना राऊत म्हणाले, घोडेबाजारात तुम्ही किती हजार कोटींची उधळपट्टी केली, हे सर्व लोकांना माहिती झाले आहे. अशा प्रकारे पैशांचा वारेमाप वापर करून शिवसेना संपवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल, तर तुमचा विचार फोल ठरेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तुम्ही विकत घेतले असतील. पण शिवसैनिक विकत घेण्याचा विचार तुम्ही कदापि करू नका. शिवसैनिक तुम्हाला गाडून टाकतील.

राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले, ज्या दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले, तेव्हाच जे लोक मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेले होते, त्यांचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाटक सुरू झाले.
5-6 महिन्यांपूर्वीपासून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत होते.
तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे असेल, तर मी खाली उतरतो असे त्यांना सांगितले होते. एकनाथ शिंदेंशी वारंवार सविस्तर चर्चा झाली होती.
पक्षात फूट पाडण्याचे काम करू नका असे त्यांना सांगितले होते.

 

सूरतला ते गेले, त्याच्याही आधी 3 ते 4 वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता.
उद्धव ठाकरेंसोबत अन्नावर हात ठेवून ज्यांनी शपथ घेतली होती, असे काही मंत्री दुसर्‍या तासाला निघून गेले होते.

 

राऊत म्हणाले, राज्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आजही तेवढ्याच ताकदीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत.
राज्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करत आहेत.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shiv sena mp vinayak raut criticised cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा