Maharashtra Political Crisis | भावना गवळींचा उध्दव ठाकरेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | आम्हाला दूर केले नसते तर 12 खासदार आणि 40 आमदार दूर गेले नसते. चुकले कोण याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, अशी टिका नाव न घेता भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर केली आहे. शिवसेनेत बंडखोरी करून राज्यातील सत्ता उलथवून लावणार्‍या शिंदे गटातील (Eknath Shinde) प्रत्येकाचा उल्लेख शिवसेनेकडून गद्दार म्हणून केला जात आहे. सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आक्रमक झाले असून ते सातत्याने शिंदे गटावर प्रहार करत आहेत. आता शिंदे गटातील खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी यास प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

एका मराठा वृत्तवाहिनीशी बोलताना भावना गवळी म्हणाल्या, माझ्या विचारात फरक पडलेला नाही. तुम्ही आम्हाला विकासाच्या योजना देणार नाही, नेता आम्हाला भेटणार नाही तर जनताही आम्हाला जवळ करणार नाही. मग चुकले कोण? याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे. (Maharashtra Political Crisis)

 

भावना गवळी म्हणाल्या, आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही भाजप आणि शिवसेनेची युती घट्ट केली. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. उद्धव ठाकरे काय करत होते हे माहिती नाही. उद्धव ठाकरे माझे नेतेच होते. म्हणून मी काहीतरी वेगळे बोलायला पाहिजे असे नाही. बोलायची वेळ आली तर मी 25 वर्षाची खासदार आहे, एक महिला आहे मग तेव्हा काय झाले? बरेच काही बोलता येते.

त्या पुढे म्हणाल्या, ईडीचा ससेमिरा असाताना मतदारांना थेट भेटू शकत नसले, तरी संपर्कात होते. मी दोन वर्षांची खासदार नाही. पाच टर्मची खासदार आहे. माझ्यात कुठलाही फरक पडलेला नाही. माझ्या मतदारांमध्ये फरक पडलेला नाही.

 

दरम्यान, एक वर्षानंतर भावना गवळी आपल्या मतदारसंघात गेल्या आहेत.
खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली होती.
तेव्हापासून खासदार गवळी मतदारसंघात आल्या नव्हत्या.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shiv sena rebel mp bhavana gawali criticised uddhav thackeray after join eknath shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाला बदल, जाणून घ्या नवीन दर

 

Pune Crime | मोबाईल टॉवरच्या बीटीएस बॉक्समधून बेस बँड मशीनची चोरी करणारी टोळी गजाआड

 

Pune DPDC News | डीपीडीसीकडून आरोग्य सुविधांसाठी 12 कोटी 68 लाखांचा निधी