मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना नेते (Shivsena Leader) सध्या डॅमेज कंट्रोलसाठी अनेक प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वत: नेते आणि पदाधिकार्यांच्या बैठका घेत आहेत. दरम्यान, बंडखोरांना परत येण्यासाठी प्रयत्न करू नका, असा सल्ला शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. (Maharashtra Political Crisis)
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Former Union Minister Anant Gite) यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे की, वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाही. ते प्रयत्न उद्धव ठाकरेंनी करू नयेत. मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू. बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही, असा हल्लाबोल गिते यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)
—
अनंत गिते यांनी म्हटले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. इशारा हा शब्द मुद्दाम वापरतोय. फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचे पाप तुम्ही करू नका. हे सांगण्याचे धाडस माझ्याकडे आहे. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोणते पाप करत आहात. शिवसेना ही केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे.
बंडखोरांना जहाल भाषेत सुनावताना गिते म्हणाले, जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे.
फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केले, त्यात जनतेचे हित काय आहे ? ते कोकणच्या विकासासाठी गेले आहेत का ? जनतेच्या प्रश्नासाठी गेले आहेत का ? त्यात नुकसानच होणार आहे.
पण या सगळ्या नुकसानाला जबाबदार हे बेईमान बंडखोर असणार आहेत.
Web Title :- Maharashtra Political Crisis | shiv sena senior leader anant geete advice party chief uddhav thackeray over all rebel mla with eknath shinde
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update