Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3 आघाड्यांवर देणार धक्का, शिवसेनेने आखली योजना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीला जशासतसे उत्तर देण्याचे आता शिवसेनेने ठरवले आहे. गुवाहाटीत चाळीस आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत आहेत. या बंडाच्या वादात आता अनेक कायदेशीर आणि राजकीय पेच निर्माण झाले आहेत. दुसरीकडे शिवसैनिक (Shivsena) सुद्धा आक्रमक झाले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) घटक पक्ष असलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादीने (Congress-NCP) शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिंदे गटाचे बंड मोडून काढण्यासाठी महत्वाची चर्चा झाली आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून शिंदे गटाला तीन आघाड्यांवर धक्का देण्याचे ठरल्याचे समजते. (Maharashtra Political Crisis)

 

न्यायालयात लढू, रस्त्यावर संघर्ष करू आणि विधानसभेतही मुकाबला करू, असा निर्धार करत शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यामुळे हा वाद आता दिर्घकाळ चालणार असे चित्र आहे. सुरतहून गुवाहाटीला पोहचलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार आता गुवाहाटीत अडकून पडल्याचे दिसत आहे. कारण त्यांच्यासमोर कायदेशीर आणि राजकीय पेच निर्माण झाला.

 

यापूर्वी शिंदे गटाने आमच्यासोबत 46 आमदार आहेत. पक्षाचे दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याने आमचाच गट खरी शिवसेना दावा केला आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब, असे नावही धारण केले आहे. मात्र आता मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटाला त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी दोन हात करण्याची योजना आखली आहे. पुढील काही दिवसांमध्ये शिवसेनेचे नेते पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतील. तसेच विविध जिल्ह्यांचे दौरेही केले जातील. (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेला नव्याने बळ देण्याची जबाबदारी अनिल देसाई, सुभाष देसाई, अनिल परब, सुनिल प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या आव्हानाचा मुकाबला करायचा निर्धार पक्षाने आणि नेतृत्त्वाने केल्याचे सेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले. सुरुवातीला पक्षाचे नेतृत्त्व संयमी आणि उदास होते. मात्र आता संघर्ष करण्याचे ठरले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या ठरावांमधून ते स्पष्ट होत आहे. आम्ही बंडखोरांचा मुकाबला पूर्ण ताकदीनिशी करू. त्यांच्या मतदारसंघात असलेले शिवसैनिक, पदाधिकारी, संघटना आमच्याच सोबत राहील, याची काळजी घेतली जाईल. आम्ही न्यायालयात लढू, रस्त्यावर संघर्ष करू आणि विधानसभेतही मुकाबला करू. सर्व आघाड्यांवर संघर्ष करू, असे या पदाधिकार्‍याने सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे एक दिवस आड पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत.

 

युवासेनेच्या बैठकीत अनेक ठराव घेण्यात येणार असून लवकरच बंडखोर आमदारांच्या नातेवाईकांची पदे काढून घेतली जाऊ शकतात.
यामुळे आमदार पुत्रांची धाकधुक वाढली आहे.
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) राज्यातील अनेक शहरांचे दौरे करणार आहेत.
मेळावे घेणार आहेत. आदित्य यांनी काल दक्षिण मुंबईत पहिला मेळावा घेतला.

 

भारतीय कामगार सेना, युवासेना अशा शिवसेनेच्या अनेक संघटना अद्यापही शिवसेनेसोबतच आहेत.
तसेच शिवसेनेचे अनेक शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख यांचीही चाचपणी करण्यात येत आहे. बंडखोरी कुठपर्यंत पोहोचली आहे, त्याचा अंदाज घेण्यात येत आहे.
त्यानुसार सर्व पदाधिकार्‍यांना पक्षासोबत ठेवण्यासाठी नेतृत्त्वाने प्रयत्नशील आहे. पक्षावरील पकड पुन्हा घट्ट करण्यात येत आहे.

 

Web Title :-  Maharashtra Political Crisis | shiv sena strategizes lays ground for long war ahead maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा