Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय ‘अलर्ट’वर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात सुरु झालेलं वादळ अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला हाय अलर्टवर (High Alert) राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर (Maharashtra Political Crisis) रस्त्यावर उतरतील अशी सूचना पोलिसांना मिळाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. राज्यातील शांततेला कोणताही धक्का लागू नये यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

 

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Political Crisis) गोंधळ सुरु असताना कोणत्याही अनपेक्षित संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था (Law and Order) अबाधित राखण्याच्या सक्त सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी आपल्या पद्धतीने बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील परिस्थिती आता शांत असल्याचे दिसत असले तरी आतून मिळत असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आपल्या कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा पर्यायही खुला असल्याची विधाने शिवसेनेचे काही नेते करतात तेव्हा ही शक्यता अधिकच वाढते. पोलीस कोणत्याही परिस्थितीत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाला आहे.
राज्यातील अनेक भागात शिवसैनिकांनी शुक्रवारी आंदोलन केलं. मुंबईतील शिवसैनिक विशेष आक्रमक होते.
शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या कुर्ला येथील नेहरु नगर येथील कार्यालयावर हल्ला केला.
यावेळी शिवसैनिकांच्या हातात लोखंडी रॉड होते. त्यांनी रॉडने मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर हल्ला केला.

यावेळी कुडाळकर यांच्या नावाचा बॅनर फाडण्यात आले.
तसेच आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांचाही बॅनर फाडला. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले.

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsainiks can be aggressive order to keep all police stations in the state on high alert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

 

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर, सहा प्रभागात महिलांची संख्या अधिक

 

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा