Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आजही निवडणुक आयोगात निर्णय नाही; पुढील सुनावणी आता २३ जानेवारीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | शिवसेना (Shivsena) पक्षातील फूटीनंतर खरा शिवसेना पक्ष कुणाचा? आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे? यावरील निवडणुक आयोगासमोरील सुनावणी आज दि. २० पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी सोमवारी म्हणजेच २३ जानेवारीला होणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल (Adv. Kapil Sibbal), देवदत्त कामत (Adv. Devdatta Kamat) यांच्याकडून तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांच्याकडून युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis)

 

यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरे गटाकडून युक्तीवाद करताना त्यांनी खालील काही महत्वाचे मुद्दे निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आणले :

जर यांचं (शिंदे गट) बंड झालं होतं तर एक महिना आयोगाकडे येण्यासाठी का लावला?

राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर.

ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या.

एकनाथ शिंदेंचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहा. आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या. दोन्ही ठिकाणी आमचं संख्याबळ जास्त, सभागृहांमध्येही आमचं स्थान आहे.

पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी, घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडे, शिंदे गटाकडे प्रतिनिधी सभा (House of Representatives) नाही, जी आहे ती घटनाबाह्य..

शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, ६१ पैकी २८ जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत.

लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं, गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला गेले, एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत होते आणि ते कार्यरत होते.

राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटानं कोणती कागदपत्रं सादर केली आहेत का? शिंदे गट राजकीय पक्ष नाही.

शिवसेनेच्या सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच, ठाकरे गटच खरी शिवसेना; ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही, शिवसेनेची घटना सिब्बल यांच्याकडून आयोगासमोर सादर. (Maharashtra Political Crisis)

तसेच हा वाद म्हणजे संसदीय पद्धतीची थट्टा असल्याबाबत देखील यावेळी बोलताना कपिल सिब्बल म्हणाले. त्यांनी जवळपास दीड तासाच्या वर युक्तिवाद केला.

तसेच देवदत्त कामत यांनी देखील ठाकरे गटाकडून युक्तीवाद केला. त्यावेळी त्यांनी पुढील मुद्दे निवडणुक आयोगासमोर मांडले :

ठाकरे गटाचं काम आयोगाच्या घटनेनुसारच.
शिंदे शिवसेनेत होते, मग शिवसेना बोगस असं कसं म्हणू शकतात…
शिवसेनेची घटना बोगस हा शिंदे गटाचा दावा कोणत्या आधारे?
शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच झाली नाही.
सादीक अली केस याठिकाणी लागू होऊ शकत नाही, राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ लक्षात घ्या…
मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेतच नाही, त्यामुळं ते घटनाबाह्य. असे मुद्दे देवदत्त कामत यांनी उपस्थित केले.

 

तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांच्याकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद केला. त्यांनी निवडणुक आयोगासमोर पुढील मुद्दे मांडले :

 

उद्धव ठाकरेंनी मविआ कशी बनवली?
युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली अन् नंतर मतदारांना सोडून दिलं.
आमच्या संख्येबाबत कोणताही वाद नाही.
मुख्य नेतापद हे कायदेशीर आहे.
पक्षघटनेचं आम्ही पालन केलं आहे.
शिंदेंच्या बंडानं शिवसेनेत फूटच. असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांच्याकडून करण्यात आला.

दरम्यान, दोन्ही गटांकडून निवडणुक आयोगाकडे कार्यकारिणी सदस्यांची संख्या सादर करण्यात आली आहे. त्यानुसार ठाकरे गटाने १६० राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी, २,८२,९७५ संघटनात्मक प्रतिनिधी, १९,२१,८१५ प्राथमिक सदस्य अशा एकूण २२ लाख २४ हजार ९५० पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत. तर शिंदे गटाकडून १२ खासदार, ४० आमदार, ७११ संघटनात्मक प्रतिनिधी, २०४६ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि ४,४८,३१८ प्राथमिक सदस्य अशा ४,५१,१२७ पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत. त्यामुळे आता आयोगातील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच पुढील सुनावणी ज्या दिवशी आहे त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या प्रकरणावर निकाल लागणार की ठाकरे गटाने मागणी केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांची टर्म वाढणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena election commission latest update thackeray vs shinde group party name and symbol issue uddhav thackeray eknath shinde kapli sibbal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना