Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून मोठ्या कारवाईला सुरुवात  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis |  राज्यातील सत्तानाट्याचा आजचा दुसरा दिवस आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Leader and Minister Eknath Shinde) यांनी आमदारांना घेऊन यापूर्वी सूरत (Surat) गाठले होते. त्यानंतर त्यांनी गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत अनेक आमदार (Shivsena MLA) असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं बंडखोर आमदारांना मोठा (Maharashtra Political Crisis) इशारा दिला आहे. शिवसेना आमदारांची तातडीची बैठक (Emergency Meeting) आज संध्याकाळी पाच वाजता वर्षा बंगल्यावर आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थिती आवश्यक असल्याचा आदेश पक्षाने बंडखोर आमदारांना दिला आहे.

 

या बैठकीची सूचना विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवली आहे. तसेच सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसद्वारेही आमदारांना कळवण्यात आले आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे दिल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही, असा इशारा पक्षाने दिला आहे. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास शिवसेना सदस्यत्व (Shivsena Membership) सोडण्याचा तुमचा इरादा आहे, असे मानले जाईल असा इशारा शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून (Legislative Party Office) प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी हे पत्रक काढले आहे. (Maharashtra Political Crisis)

 

काय म्हटलं पत्रात ?

शिवसेनेचे पाटणचे आमदार (Patan MLA) आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना दिलेल्या पत्रात नमूद केलंय की,
पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आणि राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज म्हणजे बुधवार 22 जून 2022 रोजी,
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी 5 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल, पत्त्यावर पाठवण्यात आली आहे.
त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमं, व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएस द्वारेही पाठवण्यात आली आहे.
या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणं दिल्याशिवाय या बैठकीला तुम्हाला गैरहजर राहता येणार नाही.

सदर बैठकीत आपण उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचं सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असं मानलं जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील (Indian Constitution) सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena gives ultimatum for his mla for todays meet Maharashtra Political Crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा